भुसावळ,(प्रतिनिधी)- भुसावळ विभागातून जाणाऱ्या जवळपास ८ रेल्वे गाड्या(एक्सप्रेस)रद्द करण्यात आल्या आहेत. झाशी रेल्वेस्थानकात दुरुस्ती करण्यात येत असल्याने या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
‘या’ आहेत रद्द करण्यात आलेल्या ट्रेन
गाडी क्र. ०१९२१ पुणे- वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन ही १४,२१,२८ रोजीची साप्ताहिक एक्सप्रेस रद्द, गाडी क्र. ०१९२२ लक्ष्मीबाई झाशी जंक्शन पुणे ही १३,२०,२७ रोजीची एक्सप्रेस रद्द.गाडी क्र. १२१७१ लोकमान्य
टिळक टर्मिनस- हरिद्वार जंक्शन द्वि- साप्ताहिक एक्सप्रेस दर सोमवार आणि गुरुवारी असते. ती ११, १४ १८,२१, २५, २८ सप्टेंबर रोजी तर गाडी क्र. १२१७२ हरिद्वार जंक्शन लोकमान्य टिळक टर्मिनस द्वि- साप्ताहिक एक्सप्रेस दर मंगळवार आणि शुक्रवारी असते ती रद्द करण्यात आली आहे.गाडी क्र. २२४५६ कालका- साईनगर शिर्डी दर गुरुवार आणिरविवारी असणारी द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस १४, १७, २१, २४, २८ सप्टेंबर रोजी तर गाडी क्र. २२४५५ साईनगर शिर्डी- कालका द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस दर मंगळवार, शनिवार असते. ही गाडी १६, १९, २३, २६, ३० सप्टेंबर रोजी रद्द असेल.
गाडी क्र. ११४०६ हजरत निझामुद्दीन भुसावळ जंक्शन गोंडवाना एक्सप्रेस दर शुक्रवार आणि रविवार असते. ती आता १५, १७, २२, २४, २९ सप्टेंबर रोजी तर गाडी क्र. १२४०५ भुसावळ– हजरत निझामुद्दीन गोंडवाना एक्सप्रेस दर मंगळवार व रविवार धावते. ती गाडी १७, १९, २४, २६ सप्टेंबर तथा १ ऑक्टोबर रोजी रद्द करण्यात आली आहे.
हे सुद्धा वाचा….
मुलगी अल्पवयीन असल्याचं माहित असूनही ठेवले शरीरसंबंध ; पतीसह मुलीचे आई – वडील, आत्या आणि मामा विरुद्ध गुन्हा दाखल
खळबळजनक ; तीन महिन्यापासून तीनही बाप बेटे करत होते महिलेवर बलात्कार ; ७०० पॉर्न व्हिडीओ सुद्धा काढले
धक्कादायक ; लग्नाला १५ वर्ष झाली… तरीही चारित्र्यावर संशय ; महिलेच्या प्रायव्हेट पार्ट मध्ये मिरची, फेविकॉल टाकले
Goa news; गोव्यात आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट उघड ; वेबसाईटच्या मदतीने ग्राहक मिळवत होते…