आधी सासऱ्याशी अवैध संबंध ठेवले आणि नंतर परदेशात जाण्यासाठी पैसे न दिल्याने सुनेने थेट सासऱ्याच्या प्रायव्हेट पार्ट कापून खून केल्याची धक्कादायक घटना गुजरातमधून समोर आली आहे. लहान मुलाच्या तक्रारीवरून वडील बेपत्ता असल्याने पोलिसांच्या चौकशीत ही घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली.एका घरात एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. वृद्धाचा खून करणारे दुसरे कोणी नसून त्याची सून असल्याचे उघड झाले आहे.तसा गुन्हा सुनेने कबूल केला आहे.
सासरे आणि सून यांचे अवैध संबंध
गुजरातमधील खडा येथील एका वृद्धाचे आपल्या सुनेशी अवैध संबंध होते. त्या व्यक्तीच्या सुनेनेही त्याच्याशी संबंध ठेवण्यासाठी पैसे घेतले होते. त्याच दरम्यान, ही महिला दुसऱ्या पुरुषाच्या प्रेमात पडली आणि परदेशात जाण्यासाठी सासऱ्याकडे दोन लाख रुपयांची मागणी करु लागली.सुनेने सासऱ्याकडे आणखी पैसे मागितले असता, त्याने ते देण्यास नकार दिला. खडा येथील 75 वर्षीय जगदीश शर्मा यांची त्यांच्याच सुनेने डोक्यात वार करुन त्यांचा प्रायव्हेट पार्ट कापून हत्या केली.
हे सुद्धा वाचा….
मुलगी अल्पवयीन असल्याचं माहित असूनही ठेवले शरीरसंबंध ; पतीसह मुलीचे आई – वडील, आत्या आणि मामा विरुद्ध गुन्हा दाखल
खळबळजनक ; तीन महिन्यापासून तीनही बाप बेटे करत होते महिलेवर बलात्कार ; ७०० पॉर्न व्हिडीओ सुद्धा काढले
धक्कादायक ; लग्नाला १५ वर्ष झाली… तरीही चारित्र्यावर संशय ; महिलेच्या प्रायव्हेट पार्ट मध्ये मिरची, फेविकॉल टाकले
Goa news; गोव्यात आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट उघड ; वेबसाईटच्या मदतीने ग्राहक मिळवत होते…
बेपत्ता असलेल्या शर्मा यांची कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर ही बाब उघडकीस आली. तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून तपास केला असता घरातील एका खोलीत वृद्धाचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी सुनेला ताब्यात घेऊन तिची कडक चौकशी केली असता, सुनेने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी सुनेला आता अटक केली आहे.
डोक्याला आणि गुप्तांगाला दुखापत झाल्याने वृद्धाचा मृत्यू झाल्याचे पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आले आहे. दरम्यान याप्रकरणी मृत व्यक्तीच्या मोठ्या मुलाने आपल्या लहान भावाच्या पत्नीवर खून केल्याचा संशय पोलिसांकडे व्यक्त केला होता, त्यानंतर पोलिसांनी तिची कडक चौकशी केली. चौकशीदरम्यान महिलेने गुन्ह्याची कबुली देत अनेकधक्कादायक खुलासे केले. परदेशात जाण्यासाठी पैशांची गरज असल्याचे सुनेने सांगितले, मात्र सासरच्यांनी पैसे देण्यास नकार दिला. याचाच राग आल्याने सुनेने सासऱ्याची हत्या करण्याचा निर्णय घेतला.