चाळीसगाव – कला, अध्यात्म, इतिहास याचा मोठा सांकृतिक वारसा असलेल्या चाळीसगाव शहरात खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी चाळीसगाव दहीहंडी उत्सवाचे छत्रपती शिवाजी महाराज चौक (सिग्नल चौक) येथे गेल्या सहा वर्षापासून आयोजन करण्यात येत असून यावर्षीची दहीहंडी ही अत्यंत शिस्तबद्ध नियोजन, 111111 रुपयांचे बक्षिसे, फेसबुक – युट्युब आदी सोशल मिडीयाचा सुयोग्य वापर, वाहतुकीचे योग्य नियोजन व जवळपास १५ हजाराहून अधिक चाळीसगाववासीयांचा काळजाचा थरकाप उडवणारी उपस्थिती, गोविंदा पथकांचे शिस्तबद्ध प्रात्यक्षिक, बालगोपाळांना खांद्यावर घेऊन थिरकणारे पालक आदी वैशिष्ट्यांसह वरूण राजाची कृपेने भर पावसाने हि दही हंडी भव्य – दिव्य ठरली. सदर मानाची दहीहंडी फोडण्याचा मान सात थर लावत नेताजी पालकर चौक विजेता ठरला. विजेत्या संघाला खासदार उन्मेश दादा पाटील व संपदाताई पाटील यांच्या हस्ते 1,11,111बक्षीस व पाच फुटी आकर्षक सन्मानचिन्ह देण्यात आले.
आर जे अभय यांच्या खुमासदार सूत्रसंचालनात डी जे च्या आवाजात, आकर्षक एल ई डी दिव्यांची रोषणाईत प्रचंड जल्लोषात बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी सहभागी संघाचा उत्साह वाढविण्यासाठी मंचावर खासदार उन्मेशदादा पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनिल निकम, पंचायत समितीचे सभापती दिनेश बोरसे, उपसभापती भाऊसाहेब पाटील, जेष्ठ नगरसेवक राजू आण्णा चौधरी, संजयआबा राजपुत, बापु आहीरे, सोमसिंग राजपुत, आण्णासाहेब कोळी, ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष संजीव निकम, राकेश कोतकर, युवा मोर्चाचे रोहन सूर्यवंशी, माजी शहराध्यक्ष अक्षय मराठे, मार्केट सदस्य विश्वजित पाटील, व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अमित सुराणा, रवीआबा पाटील, रवीभाऊ चौधरी, प्रवीण पाटील, पिंटू पाटील, रयत क्रांती सेनेचे प्रदेशाध्यक्ष पप्पू पाटील, भैय्यासाहेब सोनवणे, शेषराव चव्हाण, सचिन पाटील सर, भूषण साळुंखे, समकित छाजेड, नरेन जैन, चेतन वाघ, अनिल पाटील, संतोष मोरे, किशोर पाटील, साहेबराव राठोड, अनिल चव्हाण, अजय वाणी, स्वामी पाटील, समर्थ पाटील, सुवर्णा राजपूत यांच्यासह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी चाळीसगाव शहरातील १५ हजाराहून अधिक तरुण,नागरिक बंधू भगिनी मोठ्या सहभागी झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातील दहीहंडी महोत्सव पोहचवला घराघरात…
दहीहंडीचे हे सहावे वर्ष होते. सूत्रबद्ध व भव्य नियोजनामुळे यावर्षी भाजपातर्फे होणाऱ्या दहीहंडी उत्सवाची चर्चा तालुकाभरात होती. खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या सूचनेनुसार सदर उत्सवाचे थेट लाइव्ह प्रक्षेपण हे फेसबुक व युट्यूब वर करण्यात आले. या माध्यमातून चाळीसगाव शहरासह खेड्यापाड्यातील व राज्यभरात जवळपास 50 हजार नागरिकांनी या उत्सवाच्या थेट प्रक्षेपणाचा लाभ घेतला. ड्रोन व विविध अंगाने डिजिटल कॅमेरे, कार्यक्रमस्थळी एलइडी प्रक्षेपण, आर जे अभय यांचे सूत्रसंचलन, खासदार उन्मेशदादांनी वेळोवेळी कार्यकर्त्यांसह धरलेला ठेका यामुळे एखाद्या महानगरातल्या दहीहंडी उत्सव आपण लाइव्ह बघत असल्याची अनुभूती चाळीसगाव वासियांनी अनुभवली.
गोविंदा पथकांची जय्यत तयारी
चाळीसगाव शहरातील विविध गोविंदा पथकांनी यावर्षी जय्यत तयारी केली होती. नेताजी पालकर चौक, अण्णा कोळी एस के ग्रुप, राहुल पॉईंट जिद्दी ग्रुप, भावेश कोठावदे यांचे आरंभ गोविंदा पथक, चौधरीवाडा येथील महावीर गोविंदा पथक, भोला अजबे यांचे रामसेना गोविंदा पथकांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने थर लावण्याचा प्रयत्न केला मात्र नेताजी पालकर चौकाने पहिल्याच प्रयत्नात सात थर लावत पहिले बक्षीस मिळवले. त्यांचे प्रशिक्षक दीपक कोळी, सलामी देणारी बाल युवती गोविंदा कीर्ती जाधव, दहीहंडी फोडणारे बबलू पाटील यांचा खासदार उन्मेशदादा पाटील यांनी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये व भगवान श्रीकृष्णाची मूर्ती असलेली ट्रॉफी भेट देऊन सत्कार केला. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौरव पाटील, सारंग जाधव, कल्पेश मालपुरे, ऋषि पाटील, अमोल मराठे, अक्षय मराठे, गणेश पाटील, सोनू अहिरे, गणेश महाले, मनोज पाटील, योगेश गव्हाणे, भोजराज खैरे, सर्वेश पिंगळे, मंदार नेरकर, सुनील रणदिवे, कल्पेश पाटील, मुकेश गोसावी, सचिन राठोड, बंटी चौधरी, अक्षय पाटील, विनायक वाघ, रोहित भारती, ऋत्विक पाटील, उदय पवार (ज्यु), मनोज गोत्रे, शुभम कासार यांच्यासह भाजप कार्यकर्ते, खासदार उन्मेशदादा पाटील मित्र मंडळाने परिश्रम घेतले.