गोवा – मारिया डोरकास आणि विल्किस्टा या तस्कर जोडीचा समावेश असलेला हा सेक्स रॅकेट मोठ्या प्रमाणात ऑनलाइन ग्राहक मिळवण्यासाठी एस्कॉर्ट वेबसाइटच्या मदतीने ग्राहक मिळवून आपला गोरख धंदा करत असणाऱ्या टोळीचे गोवा पोलिसांनी पितळ उघडे पाडले गोवा पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा केनिया आणि भारतादरम्यान कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय लैंगिक तस्करीचा पर्दाफाश करून इस्त्रायलमधील एक आणि केनियातील एक मिळून दोन महिलांना अटक केली आहे.
याबाबत पोलीस उपाधीक्षक जिवबा दळवी यांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले की, मारिया डोरकास (इस्रायल) आणि विल्किस्टा अचिस्टा (केनिया) या दोन आरोपींना आंतरराष्ट्रीय लैंगिक तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ते म्हणाले की ‘अर्झ’ या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने राज्य पोलिसांनी केलेल्या कारवाईत पाच महिलांची सुटका करण्यात आली.
खोटं अश्वासन देऊन महिलांना भारतात आणलं जात होतं
शिक्षित केनियन महिलांना गोव्यातील तस्करांच्या वतीने काम करणार्या एजंटांकडून हॉस्पिटॅलिटी उद्योगात नोकरीचे खोटे आश्वासन देऊन गोव्यात आणलं जात होतं भारतात आणल्यानंतर, तस्करांनी महिलांचे पासपोर्ट आणि व्हिसा जप्त केले आणि हिंसाचाराच्या भीतीने त्यांना वेश्याव्यवसायात भाग पाडले होते पीडित महिलांना वेश्याव्यवसायासाठी बेंगळुरूला नेले जात असताना त्यांची सुटका करून महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.