मुंबई,(प्रतिनिधी)- राज्यभरात गुरुवारी दहीहंडीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला यावेळी मुंबई व ठाण्यात मोठमोठ्या बक्षिसांच्या मानाच्या दहीहंड्या आयोजित करण्यात आल्या होत्या यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राम कदम यांच्या घाटकोपरमधील दहीहंडी सोहळ्यात सहभाग घेत महिलांसोबत फुगडी खेळून व तरुणांसोबत भर पावसात डान्स करून एकच धमाल उडवून दिली असून त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे.
किरीट सोमय्या यांनी राम कदम यांच्या दहीहंडीला भेट देऊन अभिनेता गोविंदासोबत मनसोक्त डान्स केला. तसेच भरपावसात गोविंदांच्या खांद्यावर बसून नाचण्याचा मनसोक्त आनंद घेतला. एवढेच नाही तर त्यांनी गोविंदांच्या थरांवरही चढले. याशिवाय पारंपरिक मराठी वेशभूषेत आलेल्या काही महिलांसोबत त्यांनी फुगड्याही घातल्या.किरीट सोमय्या यांच्याशिवाय भाजप नेते चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, राधाकृष्ण विखे पाटील आदी नेत्यांनीही दहीहंडी कार्यक्रमात फुगडी खेळून आनंदोत्सव साजरा केला.
बीजेपी नेता @KiritSomaiya ने महिलाओ के साथ खेली फुगड़ी #dahihandi2023 #Janmashtami pic.twitter.com/Jg7gkbFimN
— Namrata Dubey (@namrata_forNews) September 7, 2023