जळगाव,(प्रतिनिधी)- गेल्या महिनाभरात पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर दुष्काळ पडतो की काय असं मोठं संकट ठाकलं असतांना पावसाने जोरदार कमबॅक केल्याने शेतकऱ्यासह सर्वांसाठीच आनंदाची बातमी मिळाली असून हवामान विभागाने पुढील तीन दिवस महराष्ट्रासह, पश्चिम मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
या जिल्ह्यांना यलो अलर्ट….
भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये आज शुक्रवारी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
मुंबई शहर व उपनगरांसह ठाणे शहर, कल्याण-डोंबिवली, कर्जत, कसारा, पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला.