भडगाव-अंचळगाव ता.भडगाव येथील जि.प.शाळेत कार्यरत असणारे शिक्षक गणेश पाटील लातुरकर यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक म्हणुन सन्मानित करण्यात आले आहे.शिक्षक म्हणुन कार्य करणाऱ्या शिक्षकांना शासनाच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. जिल्हा परिषद जळगावच्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्ह्याचे पालक मंत्री मा. ना.श्री.गुलाबराव पाटील मंत्री पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन,जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,जि. प.मुख्याधिकारी अंकित पन्नू ,प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील,माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन परदेशी,डायट चे प्राचार्य डॉ.झोपे,माऊली फाऊंडेशनचे अध्यक्ष मनोहर सुर्यंवंशी,माऊली टीम, भडगाव तालुक्यातील शिक्षकवृंद यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्ह्याचे पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आहे.
गणेश पाटील लातुरकर यांना प.स.भडगाव चा तालुकास्तरीय आदर्श र्शिक्षक पुरस्कार,जिल्हास्तरीय उत्कृष्ठ बी.एल.ओ.पुरस्कार असे विविध पुरस्कार मिळालेले आहेत.तसेच तंबाखूमुक्त भडगाव तालुका करण्यात तालुका समन्वयक म्हणून कार्य करत असताना सिंहाचा वाटा आहे.सध्या ते राज्यशास्त्र विषयांमधून पीएचडी करीत आहेत.शिक्षण दानाचे कार्य करीत असतांना त्यांचा सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग आहे.माऊली फाऊंडेशन भडगावचे ते सक्रिय स्वयंसेवक म्हणुन कार्यरत असुन माऊली फाऊंडेशनच्या विविध उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो.त्यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे त्यांचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.