धरणगाव : तालुक्यातील चामगाव येथील सुखदेव चिंधु रायसिंगे (कोळी) यांच्या घरात मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एक गावठी तर एक विदेशी अशी दोन पिस्तुले आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
येथील पोलीस स्टेशनमधील पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.या पथकात पो.ना. मोती पवार, हवालदार करीम सैय्यद, पोलीस शिपाई पंकज पाटील, वसंत कोळी याचा समावेश होता. याप्रकरणी पोलीस शिपाई मोती पवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी फरार असून शहर व परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.