जळगाव,(प्रतिनिधी)- नागरीकांना पैशांचे आमीष दाखवून त्यांचे नावे चालु व बचत बँक खाते उघडुन त्या बँक खात्यांचा वापर ते मोठया प्रमाणावर सायबर गुन्हे करण्यासाठी वापरणारा ‘ठग’ जळगांव सायबर पोलीसांचे जाळयात अडकला असून पोलिसांनी त्यास अटक केली आहे.
सविस्तर असे की,नागरीकांना व्हॉट्सअॅप वरती बाहेर देशातील नंबरने (व्हॅच्युअल नंबरने) जसे +४४, +८८, +९२, +९७ अशा विविधि देशांचे कोड असलेले व्हॉट्स अॅप मॅसेज प्राप्त होत आहे. त्यामध्ये नागरीकांना सुरुवातीला कोणतीही गुंतवणुक न करता दररोज ५०० ते १००० रुपये कमवा असे मॅसेज प्राप्त होत आहे. त्यामध्ये नागरीकांना त्यांचे व्हॉट्सअॅप क्रमांकावर YouTube Video बघुन त्यांना लाईक कराचे सबस्क्राईब करायचे, Amazon, Mesho, Myntra, Flipkart, Ajo यावर ऑनलाईन प्रोडक्ट्स ला लाईक करायचे असे विविध प्रकारचे टास्क देवून नागरीकांना त्यांचे बँक खात्यामध्ये सुरुवातीला ५०० पासुन ते ५००० रुपये त्यांचे खात्यामध्ये ऑनलाईन पाठविले जातात. त्यानंतर त्यांना प्रिपेड टास्क दिला जातो त्यामध्ये नागरीकांना सुरुवातीला कमीत कमी १०००/- रुपये गुंतवणुक करण्यास सांगुन त्यांना १००० रुपयांवरती २०० ते ३०० रुपये कमीशन दिले जाते. त्यानंतर हळुहळु त्यांचे कडुन प्रिपेड टास्क साठी पैसे घेतले जातात व त्यांना नफा म्हणुन त्यांनी भरलेल्या पैशांवर १००० ते १५०० रुपये नफा दिला जातो.
त्यानंतर त्यांना टेलिग्राम ग्रुपला अॅड केले जाते. त्यामध्ये त्यांना क्रिप्टोकरन्सी वाबत माहिती दिली जाते त्यामध्ये आपण गुंतवणुक केल्यास मोठ्या प्रमाणावर नफा मिळतो. सुरुवातीला बनावट क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग वेबसाईट वरती त्यांना युजर आयड व पासवर्ड तयार करुन दिला जातो. त्यानंतर त्यांना त्यामध्ये गुंतवणुक करण्यास सांगितली जाते सुरुवातीला त्यांना मोठया प्रमाणावर नफा देवुन मोठी गुंतवणुक करण्याचे आमीष दाखविले जाते अशा मोहास बळी पडुन जळगांव शहरातील तक्रारदार पवन बळीराम सोनवणे यांची 15,35,000/- रुपयांना फसवणुक करण्यात आली होती त्यामध्ये फिर्यादी यांनी 7 बँक खात्यांमध्ये ऑनलाईन 15,35,000/- रुपये ऑनलाईन भरले होते. सदर गुन्हयाचे तांत्रिक विश्लेषन केले असता फिर्यादी यांनी ज्या 7 बैंक खात्यामध्ये पैसे भरलेले होते ते भारतातील विविध राज्यांमधील आहेत. सदर गुन्हयात श्रीनगर येथील आरोपी अटक करण्यात आला आहे. तसेच एक आरोपीस मुंबई येथून ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबई येथील आरोपी राकेश मिश्रा हा ऑनलाईन फ्रॉडचा पैसा वळविण्यासाठी जी चालु व बचत बँक खाती लागतात ते तो नागरीकांना आमिष दाखवून त्यांचेकडुन काढुन सदर बँक खात्याचे किट त्यामध्ये ATM Card, चेकबुक, बँक खात्याशी लिंक असलेले सिमकार्ड इत्यादी माहिती तो पुढे पाठवित होता.
राकेश मिश्रा याचेकडुन विविध बँक खात्यांचे 150 चेकबुक, 178 सिमकार्ड, 160 ATM Card, १ इंटरनेट राऊटर, १ लॅपटॉप, १ कंम्प्युटर सिपीयु. १० मोबाईल व १ प्रिंटर असा मुद्देमाल आरोपी राकेश मिश्रा याचेकडुन जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचे तपासात तात्काळ बँकेशी पत्रव्यवहार करुन फिर्यादी यांनी ज्या बँक खात्यांमध्ये पैसे भरले होते ते बैंक खाते डेबिट फ्रिज करण्यात आल्यामुळे फिर्यादी यांचे १२ लाख रुपये एवढी रक्कम थांबविण्यात सायबर पोलीसांना यश आले आहे.
सदर गुन्हयाचे तपासात मा. पोलीस अधीक्षक जळगाव, मा. अपर पोलीस अधीक्षक, जळगाव परिमंडळ यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक बी. डी. जगताप यांनी व त्यांचे अधिनस्त सायबर पो.स्टे. चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तपासाचे अनुषंगाने फिर्यादी यांना आलेले मोबाईल कॉल, व्हॉट्सअॅप मॅसेज, तसेच फिर्यादी यांनी ज्या बँक खात्यामध्ये पैसे भरलेले आहेत त्याबाबत संबंधीतांकडुन वेळोवेळी आवश्यक ती माहीती प्राप्त करुन तिचे तांत्रिक विश्लेषण पोउपनि दिगंबर थोरात व पोहेकॉ दिलीप चिंचोले यांनी करुन त्याव्दारे गुन्हयातील आरोपीतांचा टिकाणा निष्पन्न केला असता सदर आरोपी हा मुंबई येथील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मा. पोलीस अधीक्षक, जळगाव यांचे आदेशाने सदर गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे कामी पोउपनि दिगंबर थोरात यांचे सोबत पोहेकॉ प्रविण वाघ, पोहेकॉ / राजेश चौधरी, पोहेकॉ दिलीप चिंचोले, असे तपास पथक मुंबई येथे रवाना झाले होते. त्यांनी राकेश मिश्रा यास घाटकोपर मुंबई येथून ताब्यात घेतले आहे.
तरी सायबर पोलीस स्टेशन जळगाव कडून जिल्ह्यातील नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे की, स्वतः चे नावाचे बँक खाते तसेच बँक खात्याची माहिती इतर कोणानालाही देवु नये. तसेच आपणास अनोळखी व्यक्तींना आपले आधारकार्ड, पॅनकार्ड, ई-मेल आयड ची माहिती हि शेअर करु नये. तसेच आपणास कोणी बैंक खाते उघडुन कमीशन बेसवर वापरण्यास मागत असेल तर आपण तात्काळ सायबर पोलीस स्टेशन येथे फोन क्रं. ०२५७-२२२९६९५ यावर संपर्क करावा