जळगाव जिल्हयांत ठिकाणी गावटी हात भट्टी दारुच्या भट्या लावून त्यातुन गावठी हात भट्टीची दारु तयार करून त्यांची चोरटी विक्री करीत असल्याची माहिती एम. राज कुमार, पोलीस अधीक्षक, जळगाव यांना व डॉ. व्ही. टी. भुकन, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जळगाव यांना मिळाली.
सदर गावठी हात भट्टीच्या दारु मुळे जळगाव जिल्हयांत तरुण पिढीचे मुले व्यसनाधीन होत असल्याने एम. राज कुमार, पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी व डॉ. व्ही.टी. भुकन, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जळगाव यानी आप-आपल्या विभागाचे अधिकारी व अंमलदार व स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. किसन नजनपाटील यांना गावठी हात भट्टीची दारु तयार करणारे व विक्री करणारे इसमावर कठोर कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन करुन त्यांना योग्य त्या सूचना दिल्या.
जळगाव जिल्हा पोलीस दल व राज्य उत्पादन शुल्क, जळगाव अशांनी दिनांक १८/०८/२०२३ रोजी संयुक्तीकरित्या जळगाव विशेष मोहिम राबविली असता जळगाव जिल्हयांत जळगाव पोलीस दलाने विविध पोलीस स्टेशनला एकूण ६५ कारवाई करुन एकूण ३,९६,०८५/- रुपयांचे २५,२५६ लिटर कच्चे रसायन व ७७२ लिटर तयार गावठी हात भट्टीची दारू नाश केली आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क, जळगाव यांनी जळगाव जिल्हयांत एकूण २० कारवाई करुन एकूण १,३६,८००/- रुपयाचेच १५,२५० लिटर कच्चे रसायन व ४४० लिटर तयार गावठी हात भट्टीची दारू नाश केली आहे.
जळगाव जिल्हयांत जळगाव पोलीस दल व राज्य उत्पादन शुल्क, जळगाव अशांनी संयुक्तीकरित्या एकूण ८५ कारवाई करुन एकूण ५,३२,८८५/- रुपयाचे ४०,५०६ लिटर कच्चे रसायन व १२१२ लिटर तयार गावठी हातभट्टीची दारु नाश करुन गावठी हातभट्टीवाल्याचे समुळ उच्चाटन करुन धडक कारवाई केलेली आहे. सदर कारवाईत जिल्हयांभरात एकूण पोलीस दलाचे एकूण ४६ पोलीस अधिकारी व २२२ पोलीस अंमलदार व राज्य उत्पादन शुल्क, जळगाव चे एकूण ६ अधिकारी व २४ अंमलदार सहभागी होते.
तसेच गावटी हात भट्टीवाले यांचे दाखल गुन्हयांचे रेकॉर्ड वरुन आज पावेतो पोलीस दला कडून ०२ व राज्य उत्पादन शुल्क, जळगाव कडून ०१ महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले व औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विना परवाना प्रदर्शन व्यक्ती (व्हिडीओ पायरेट) वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणान्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबतचा अधिनियम १९८१ (महाराष्ट्र राज्य कायदा क्रमांक ५५ सन १९८१) सुधारणा अधिनियम २०१५ अन्वये (MPDA) च्या कारवाई करून ०३ इसमांना स्थानबध्द करुन ०९ वर्षांसाठी कारागृहात रवानगी केली आहे. सदर MPDA कारवाई अंतर्गत जळगाव जिल्हयांत बरेच हातभट्टीवाले रडारवर आहेत.