मुंबई,(प्रतिनिधी)- ३७ दिवसांच्या कायदेशीर लढाईनंतर जेएसडब्ल्यू प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना हक्काच्या लढाईत यश आले असून हे यश प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असल्याचे प्रतिपादन मासू संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड सिद्धार्थ इंगळे यांनी शेतकऱ्यांच्या बैठकीत केले.
दरम्यान सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिलेल्या व दि. १२ जुलै २०२३ पासून बेमुदत आमरण उपोषणास बसलेल्या मुरुड तालुक्यातील सहा गावातील JSW Steel JSW, साळव प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना अखेर न्याय मिळाला आहे या ३७ दिवसात जिल्हा प्रशासन, राज्य सरकार यांच्याशी कायदेशीर व सनदशीर मार्गाने दोन हात करण्यात शेतकऱ्यांची कायदेशीर प्रतिनिधी व शेतकऱ्यांची समिती आणि स्वतः प्रकलग्रस्त शेतकरी हे यशस्वी झाले.
लढाईच्या यशानंतर….
१.नवीन विस्तार प्रकल्पात कायमस्वरूपी तत्त्वावर नोकऱ्या दिल्या जाणार.
२. शेतकऱ्यांना नोकऱ्या न मिळालेल्या काळातील मानधनाची शासकीय नियमाप्रमाणे थकबाकी मिळणार!
३. नवीन विस्तार प्रकल्प सुरु होईपर्यंत शेतकऱ्यांना मासिक मानधन दिले जाणार.
४. पुढील येणाऱ्या दोन वर्षात नवीन प्रकल्प विस्तार करण्यात जेएसडब्ल्यू असमर्थ झाल्यास प्रकलग्रस्त शेतकाऱ्यांची ७७५ एकर जागा सरकारी जमा होणार.