पत्नीला पती व सासरच्या मालमत्तेवर किती असतो हक्क याबाबत आज आपण संपूर्ण कायदेविषयक माहिती जाणून घेणार आहोत.पतीच्या मालमत्तेवर, प्रॉपर्टीवर पत्नीचा पूर्ण हक्क असतो, असं म्हटलं जातं. मात्र हे पूर्णपणे सत्य नाही आणि म्हणूनचं प्रत्येक महिलांना कायदेशीर याबाबत माहिती असायलाच हवी, चला तर जाणून घेऊया….
२००५ ची घटना दुरुस्ती….
२००५ ची घटना दुरुस्ती नुसार वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलाप्रमाणेच मुलींचाही समान हक्क असतो, घटना दुरुस्ती नंतर मुलीला समान वारस म्हणून गणले गेले आहे. आता मुलीच्या लग्नानंतरही वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा हक्क असतो हे खरं आहे याबाबत सर्वानाचं माहिती आहे मात्र, लग्नानंतर पतीच्या आणि सासरकडील मालमत्तेत महिलेला किती हक्क असतो? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ.
स्त्रिया लग्नानंतर आपल्या आई-वडिलांचे घर सोडून पतीच्या घरी राहायला जातात. पतीच्या संपत्तीवर पत्नीचा पूर्णपणे अधिकार नसतो. या संपत्तीवर पत्नीसोबतच घरातील इतर कुटुंबीय ही हक्क सांगू शकतात.
जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या स्वकमाईवर संपत्ती बनवली असेल. त्या मालमत्तेवर पत्नीसोबतच आई आणि मुलांचाही अधिकार असतो. जर, एखाद्या व्यक्तीने मृत्यूपत्र बनवले असेल तर त्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या नॉमिनींना या संपत्तीवर अधिकार मिळतो. यात नॉमिनी त्याची पत्नीही असू शकते. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीने मृत्यूपत्र बनवले नसेल तर त्याच्या संपत्तीत पत्नीसोबतच आई आणि मुलांनाही समान अधिकार मिळतो.
जर एखाद्या महिलेच्या पतीचा मृत्यू झालास तर पतीच्या वडिलांच्या संपत्तीवर त्या महिलेचा अधिकार नसू शकतो. पतीच्या मृत्यूनंतर महिलेला सासरचे घराबाहेर काढू शकत नाही तरीही तिच्या वडिलोपार्जित संपत्तीत कोणताही अधिकार मिळत नाही. जर, त्या महिलेला मुलं असतील तर त्यांना वडिलोपार्जित संपत्तीत समान अधिकार मिळू शकतो.
घटस्फोट झाल्यानंतर महिलेला संपत्तीत अधिकार मिळतो का?
जर एखाद्या महिलेने तिच्या पतीपासून घटस्फोट घेतला असेल तर ती तिच्या पतीकडून पोटगी मागू शकते. ही पोटगी पती-पत्नी दोघांच्या आर्थिक स्थितीच्या आधारावर ठरवले जाते. घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये महिन्याचा देखभाला व्यतिरिक्त, एक वेळ सेटलमेंटचा पर्याय देखील उपलब्ध आहे. घटस्फोटानंतर मुलं आईसोबत राहत असतील, तर त्यांच्याही पालनपोषणाचा खर्च नवऱ्याला करावा लागेल. घटस्फोट झाल्यास पतीच्या संपत्तीवर पत्नीचा अधिकार नसतो. मात्र, संपत्तीवर महिलेच्या मुलांचा पूर्ण हक्क आहे. दुसरीकडे, जर पती-पत्नीची अशी कोणतीही मालमत्ता असेल ज्यामध्ये ते दोघेही मालक असतील, तर ती समान प्रमाणात विभागली जाते.
आपल्या देशात कायद्याविषयी अद्यापही अनेकांमध्ये गैरसमज असल्याचे दिसून येते. याच गैरसमजातून अनेक चुकीचे निर्णय देखील घेतले जातात. त्यामुळे अनेक चुकीच्या गोष्टी लोकांसमोर येतात. यामध्ये पत्नीला तिच्या पतीच्या मालमत्तेत (Right Of Wife On Husband Property) किंवा पतीच्या पालकांच्या मालमत्तेवर हक्क असतो का किंवा तो किती असतो याबाबतही अनेकांना आवश्यक ती माहिती नसते. त्यामुळे काहीवेळा अडचणी निर्माण होतात. मात्र भारतात याबाबत कायद्यात स्पष्ट तरतुदी करण्यात आल्या आहेत.
पतीच्या मालकीच्या संपूर्ण मालमत्तेवर पत्नीचा पूर्णतः अधिकार असतोच असे नाही. पत्नीला तिच्या सासरच्या संपत्तीवर तितकाच अधिकार असतो जितका अधिकार तिच्या सासरच्या मंडळींना द्यायचा असतो. तितकाच अधिकार हा पतीच्या संपत्तीवरही असतो. कोणत्याही व्यक्तीची त्याने स्वतः मिळवलेली मालमत्ता आणि त्याला वारसाहक्काने मिळालेली मालमत्ता, असे दोन प्रकार असतात.
यातील पतीने स्वतः मिळवलेल्या मालमत्तेवर त्याचाच अधिकार असतो. यावरुन ती संपत्ती पत्नीला मिळणार की नाही याबाबतचा निर्णय त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असतो. त्या संपत्तीबाबत कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार हा तिने मिळवलेल्या व्यक्तीलाच असतो. ती व्यक्ती मालमत्ता विकू शकते, दान करु शकते किंवा त्याच्या मृत्यूपत्रातही जोडू शकते.
त्यामुळे भारतीय वारसाहक्क अधिनियमानुसार, त्या व्यक्तीच्या संपत्तीवर तेव्हाच हक्क असू शकतो, जेव्हा त्याचे नाव मृत्यूपत्रात मृत्यूआधीच मालमत्ता असलेल्या व्यक्तीनं लिहून ठेवलेलं असेल. त्यामुळे पती जिवंत असेपर्यंत त्याने मिळवलेल्या संपत्तीवर पत्नीला कोणताही अधिकार नसतो. जर पतीने मृत्यूपत्रात त्याच्या संपत्तीचा अधिकार पत्नीव्यतिरिक्त दुसऱ्या व्यक्तीचा उल्लेख केला असेल तर पत्नीला मालमत्तेत कोणताही अधिकार नसेल.
जर पतीचा मृत्यूपत्राशिवाय मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत त्याच्या संपत्तीवर पत्नी, आई आणि त्याच्या मुलांचा अधिकार असतो. हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 च्या नियमानुसार ही संपत्ती कुटुंबियांना मिळू शकते. दरम्यान, पती जिवंत असताना पत्नीला त्याच्या संपत्तीवर कोणताही अधिकार नाही. जर ते विभक्त झाल्यास पत्नी केवळ पोटगीचा दावा करू शकते. याव्यतिरिक्त मृत्यूपत्रात उल्लेख नसेल तर ती तिच्या पतीच्या मालमत्तेवर कोणताही दावा करू शकत नाही.