जळगाव :- ज.जि.म.वि.प्रसारक सह.संस्थेचे शिक्षणशास्त्र विद्यालय, नूतन मराठा विद्यालय व महाविद्यालय, आदर्श अध्यापन सराव पाठ शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
सदर प्रसंगी ध्वजारोहण कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे ज.जि.मराठा विद्याप्रसारक सह.संस्थेचे विद्यमान चेअरमन दादासाहेब गोकूळ पितांबर पाटील यांच्या शुभहस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पुजन माल्यार्पण करून ध्वजारोहण करण्यात आले. प्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून ज.जि.म.वि.प्रसारक संस्थेचे संचालक श्री. शंकरराव शिंदे, नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख,उपप्राचार्य प्रा. संजय एकनाथ पाटील, डी.एल.एड कॉलेजच्या प्राचार्या श्रीमती डॉ. एस. डी. सोनवणेनूतन मराठा हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री. ए. पी. सोनवणे, एन.सी.सी. प्रमुख प्रा. शिवराज पाटील, प्रा सौ. वानखेडे मॅडम, नू.म. हायस्कूल चे पर्यवेक्षक श्री. डी. व्ही. जाधव,नू.म. कॉलेजचे क्रीडा संचालक प्रा. सुभाष वानखेडे आदी मंचावर उपस्थित होते.
ध्वजारोहण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय नन्नवरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. आर. एस. पाटील, प्रा. एम. बी. मोरे, क्रीडा शिक्षक रणजित पवार, श्री. ए. एस. ठाकरे, शिक्षकेतर कर्मचारी श्री. अशोक पाटील, श्री. रवि पोळ, श्यामप्रसाद पाटील, श्री. गजानन बारी, श्री. दिलीप जगताप, श्री विजय पवार, श्री. आर. बी. पाटील, श्रीकांत पाटील, यांनी परिश्रम घेतले.
प्रसंगी नूतन मराठा महाविद्यालय, शिक्षणशास्त्र विद्यालय,नूतन मराठा हायस्कूल, डी. एड कॉलेज, आदर्श अध्यापन शाळा या सर्व शाखांचे प्राध्यापक बंधू भगिनी, शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी बंधूभगिनी, सर्व शाखांचे विद्यार्थी विद्यार्थीनी बहुसंख्याने उपस्थित होते