Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वसंत मुंडे यांनी उपस्थित केलेले पत्रकारांचे प्रश्न विधान परिषदेत मांडू ; आमदार श्रीकांत भारतीय यांचे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या सोशल मीडिया कार्यशाळेत आश्वासन

najarkaid live by najarkaid live
August 13, 2023
in राज्य
0
वसंत मुंडे यांनी उपस्थित केलेले पत्रकारांचे प्रश्न विधान परिषदेत मांडू ; आमदार श्रीकांत भारतीय यांचे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या सोशल मीडिया कार्यशाळेत आश्वासन
ADVERTISEMENT
Spread the love

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी लढा देत आहेत. पत्रकारांच्या खांद्याला खांदा लावून आपण काम करू. वसंत मुंडे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत सजग असून हे प्रश्न विधान परिषदेत प्रभावीपणे मांडू, अशी ग्वाही भाजपचे प्रदेश महामंत्री तथा विधान परिषद आमदार श्रीकांत भारतीय यांनी शनिवारी छत्रपती संभाजीनगर येथे दिली.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे सोशल मीडिया प्रशिक्षण कार्यशाळा आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या सत्कार सोहळ्यात आमदार श्रीकांत भारतीय उद्घाटक म्हणून बोलत होते.

छत्रपती संभाजीनगर येथील अदालत रोडवरील आय.एम. ए. हॉलमध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई आयोजित सोशल मीडिया प्रशिक्षण कार्यशाळेला राज्यातील शेकडो पत्रकारांनी सहभाग नोंदवला.
प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन विधान परिषद आमदार श्रीकांत भारतीय यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, प्रमुख अतिथी म्हणून दैनिक मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी, दैनिक पुढारी, मराठवाडा आवृत्तीचे संपादक धनंजय लांबे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस विश्र्वास आरोटे, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे माजी अध्यक्ष चंदन शिरवाळे, जेष्ठ पत्रकार संतोष मानुरकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पहिले सत्र पार पडले.

उद्घाटनपर भाषणात आमदार श्रीकांत भारतीय म्हणाले की , केवळ फोटो पोस्ट करणे याचा अर्थ सोशल मीडिया हाताळणे असे होत नाही.संपूर्ण राज्यात सदस्य संख्या असलेला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि त्याचे प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे हे अतिशय क्रियाशील पत्रकार आहेत. समाजातील तळागाळातील लोकांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम मुंडे यांनी आजवर केले आहे. त्यांच्यात संवेदनशिल पत्रकार, कार्यकर्ता आणि नेता दडलेला आहे, असे गौरव उद्गार भारतीय यांनी काढले. तसेच तुम्ही किती दिवस दुसऱ्याच्या मुलाखती घेणार आहात,आता तुमच्या मुलाखती घेतल्या जातील,या वळणावर आपण आहात,असे म्हणत त्यांनी वसंत मुंडे यांना थेट राजकारणात येण्याचे आवाहन केले.देण्यात जो आनंद आहे तो कशातच नाही.

त्यामुळे देणारे व्हा,गरज नसताना शासकीय सवलती घेऊ नका. यासाठी आमच्या सरकारने नियमात अनेक चांगले बदल केले आहेत. महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे जिथे अनुदान परत करणे आता शक्य झाले आहे.याच धरतीवर मी आगामी काळात अनुदान परत देण्याचे अभियान राबविणार असल्याचे भारतीय यांनी सांगितले.

प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष डॉ. प्रभू गोरे यांनी केले. याप्रसंगी संपादक चंदुलाल बियाणी, संपादक धनंजय लांबे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस विश्र्वास आरोटे, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे माजी अध्यक्ष चंदन शिरवाळे यांनीही मनोगत मांडले.
………………
आमदार श्रीकांत भारतीय यांनी
पत्रकार संघाचे पालकत्व स्वीकारावे : वसंत मुंडे

पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर रचनात्मक आणि संघर्षात्मक अशा दोन्ही पातळीवर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व्यापक लढा देत आहे. पत्रकारितेपलिकडे जावून रक्तदान शिबिरे, अवयवदान जनजागृती चळवळ, नेत्रदान जनजागृती चळवळ राबवून पत्रकार संघाने विधायक कार्य केले आहे. आमदार श्रीकांत भारतीय हे संवेदनशिल लोकप्रतिनिधी तथा मूळ पत्रकार आहेत. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पालकत्व स्वीकारावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबा श्रीहरी देशमाने, नीळकंठ कराड, मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी, ठाणे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील, नगरचे जिल्हा अध्यक्ष दत्ता घाडगे, जालना जिल्हा अध्यक्ष दिगंबर गुजर, जळगाव जिल्हा अध्यक्ष शरद कुलकर्णी, नितीन शिंदे, मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष सोमेश्वर सोनटक्के आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन राहुल गिरी यांनी केले. पहिल्या सत्राचे आभार अनिल सावंत यांनी मानले. मराठवाड्यातील नामांकित कवी दिवंगत ना. धो. महानोर, जेष्ठ विचारवंत हरी नरके यांना पत्रकार संघाच्यावतीने श्रध्दांजली वाहण्यात आली.

………….
प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांचा
झाला यथोचित गौरव

लोकमत माध्यम समुहाचा अतिशय प्रतिष्ठीत आंतरराष्ट्रीय पातळीवरील “एक्सलन्स इन सोशल जर्नलिझम अवार्ड’ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांना दुबईत प्रदान करण्यात आला. त्यानुषंगाने पत्रकार संघाच्या वतीने मुंडे यांचा आमदार श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी वसंत मुंडे यांच्या पत्रकारितेतील योगदानाबद्दल प्रकाश टाकणारा माहितीपट प्रदर्शित करण्यात आला. तसेच अधिस्वीकृती समितीवर नियुक्ती झाल्याबद्दल चंदन शिरवाळे, डॉक्टरेट पदवी प्राप्त झाल्याबद्दल विश्र्वास आरोटे यांचाही सत्कार करण्यात आला.
………………
अतुल नाईक, ऋषिकेश पवार यांचे मार्गदर्शन

सोशल मीडियाचे वाढते प्रस्थ लक्षात घेता, पत्रकार संघातर्फे राज्य पातळीवरील पदाधिकारी, विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांच्यासाठी एकदिवसीय सोशल मीडिया प्रशिक्षण शिबिरात संगणक तज्ज्ञ अतुल नाईक, ऋषिकेश पवार यांनी मार्गदर्शन केले. शेवटच्या सत्राचे आभार डॉ. प्रभू गोरे यांनी मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातील जनतेसाठी आनंदाची बातमी! आता सर्व शासकीय रूग्णालयांमधून होणार नि:शुल्क उपचार

Next Post

पोलीस पाटील व कोतवाल पदभरती परीक्षा 2023; जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर

Related Posts

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

April 9, 2025
धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

धक्कादायक ; ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

April 9, 2025

‘या’ दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपये बँकेत जमा होणार

April 2, 2025
धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

April 2, 2025
Next Post
पोलीस पाटील व कोतवाल पदभरती परीक्षा 2023;  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर

पोलीस पाटील व कोतवाल पदभरती परीक्षा 2023; जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर

ताज्या बातम्या

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

April 28, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

April 28, 2025
हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

April 28, 2025
जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

April 28, 2025
कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

April 28, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us