नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘अमृत भारत स्टेशन’ या देशातील 508 रेल्वे स्थानकांचे पुनरुज्जीवन करणारी योजना सुरू केली. रेल्वे आणि देशासाठी ही ऐतिहासिक घटना ठरली आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली. यावेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवही उपस्थित होत्या. पीएम मोदी अनेकदा सार्वजनिक वाहतूक अत्याधुनिक करण्यावर भर देतात. जेणेकरून प्रत्येक नागरिकाला सोयीस्करपणे प्रवास करता येईल.
देशातील नागरिकांसाठी रेल्वे हे सर्वात स्वस्त आणि पसंतीचे परिवहन साधन आहे. त्यामुळे ते आधुनिक आणि सोयीस्कर बनवण्याचा आग्रह पीएम मोदी घेत आहेत. याच भागात अमृत भारत स्थानक योजना सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात ५०८ रेल्वे स्थानकांचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे. यात भुसावळ विभागातील ६ रेल्वेस्थानकांचा समावेश आहे. 1300 रेल्वे स्थानकांपैकी 508 अमृत भारत स्थानकांचा पुनर्विकासावर 25 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत.
अमृत भारत स्टेशन योजनेसाठी देशातील एक हजार ३०९ स्थानकांची निवड करण्यात आली. यात मध्य रेल्वेच्या ७६ स्थानकांचा समावेश आहे; तर भुसावळ रेल्वे विभागाच्या १५ स्थानकांचा समावेश आहे.
मात्र, पहिल्या टप्प्यात मनमाड, बडनेरा, शेगाव, मलकापूर, नेपानगर, चाळीसगाव या ६ स्थानकांचा समावेश आहे.आज रविवारी विकासकामांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाइन करण्यात आले