जळगाव जिल्हा परिषदेमार्फत बंपर भरती जाहीर करण्यात आलेली असून यासाठीची भरती प्रक्रिया उद्या म्हणजेच ५ ऑगस्ट पासून सुरु होणार आहे. १७ संवर्गांसाठी तब्बल ६२६ जागांसाठी भरती केली जाणार आहे. एका पदासाठी संपूर्ण राज्यात एकाचवेळी परीक्षा होणार असल्याने उमेदवारांनी शक्यतो एका पदासाठी एकाच जिल्ह्यात अर्ज करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
जि.पची भरती प्रक्रिया आयबीपीएस या कंपनीमार्फत पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. उमेदवारांनी ठरवून दिलेल्या विहित मुदतीत अर्ज करावेत असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
ही पदे भरली जाणार?
आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).
अर्ज शुल्क: खुलाप्रवर्ग: ₹1000/-, राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक): ₹900/-.
वयोमर्यादा: लवकरच उपलब्ध होईल.
वेतन/ मानधन: दरमहा रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत.
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.