मुंबई । आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षाकडून पक्ष संघटनेत मोठे बदल करण्यात येत असून आता राष्ट्रीय पातळीवर भाजपने राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रीय महामंत्री, राष्ट्रीय सचिव यांच्या नियुक्ती केल्या जाहीर केल्या आहेत. यात महाराष्ट्रातून पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि विजया रहाटकर यांची नाव आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपमध्ये रणनीती आखाण्याची तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप पक्ष संघटनेत मोठे फेर बदल करण्यास सुरुवात केली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने राष्ट्रीय पातळीवरील नव्या टीमची घोषणा केली आहे.
हे पण वाचा..
अखेर राजपूत भामटा जमातीतील ‘भामटा’ या शब्दावर शासनाने घेतला निर्णय!
अति भयंकर! बलात्कार करून अल्पवयीन मुलीच्या प्रायवेट पार्टवर लाठीचा वार
बुलढाण्यात दोन ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, दोन्ही वाहनांचा चक्काचूर, ७ जणांचा मृत्यू
यामध्ये विनोद तावडे यांची राष्ट्रीय महामंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे तर पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांची राष्ट्रीय सचिव पदी नियुक्ती केली गेली आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून भाजप जिल्हाध्यक्षांची नवी टीम घोषित करण्यात आली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ७० संघटनात्मक जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे.