जळगाव । पारोळा तालुक्यात जून ते ऑगस्ट २०२२ कालावधीत झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आधारकार्ड, भ्रमणध्वनी क्रमांक व गट नंबर ची माहिती गावातील तलाठी किंवा कोतवाल यांच्याकडे जमा करावी. असे आवाहन पारोळा तहसीलदार डॉ.उल्हास देवरे यांनी केले आहे.
पारोळा तालुक्यातील ५८ हजार ६७५ शेतकरी अनुदानासाठी पात्र आहेत. अनुदानाची रक्कम त्यांच्या बॅंक खात्यावर जमा होण्यासाठी शेतकऱ्यांनी कागदपत्रे तात्काळ सादर करणे आवश्यक आहे.
हे सुद्धा वाचा..
मलकापूर- बुलढाणा बसचा भीषण अपघात ; ५५ प्रवाशांची बस घाटात पलटी
मुंबई पोलीस दलात 3000 पदांसाठी भरती ; शासन निर्णय जारी
संतापजनक! सावत्र पित्याचा १६ वर्षीय मुलीवर अत्याचार
शेतकऱ्यांची फसवणूक भोवली : जळगाव जिल्ह्यातील एक घाऊक व ४ किरकोळ विक्रेत्यांचे परवाने निलंबित
ऑनलाईन प्रणालीवर माहिती भरावयाची असल्याने विलंब टाळावा. माहिती लवकरात लवकर उपलब्ध झाली तर अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यावर जमा करणे प्रशासनाला सोयीचे होईल. असे ही श्री. देवरे यांनी सांगितले आहे.