बुलढाणा ! बुलढाणा जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली असून मलकापूर- बुलढाणा बसचा भीषण अपघात झाला आहे. बसचं ब्रेक फेल झाल्यानं चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. नियंत्रण सुटल्यानं ही बस राजूर घाटात पलटी झाली आहे. या बसमधून ५५ प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती असून यात या प्रवाशांमध्ये काही विद्यार्थ्यांचा देखील समावेश असल्याचं कळतंय. अपघातात १० ते १५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती कळत आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांकडून बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात येत आहे. बसचं ब्रेक फेल झाल्यानं हा अपघात झाला आहे. सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.
हे सुद्धा वाचा..
मुंबई पोलीस दलात 3000 पदांसाठी भरती ; शासन निर्णय जारी
संतापजनक! सावत्र पित्याचा १६ वर्षीय मुलीवर अत्याचार
शेतकऱ्यांची फसवणूक भोवली : जळगाव जिल्ह्यातील एक घाऊक व ४ किरकोळ विक्रेत्यांचे परवाने निलंबित
मलकापूर -बुलढाणा या बसमधून 55 प्रवासी प्रवास करत होते, बस राजूर घाटात आल्यानंतर बसचं ब्रेक फेल झालं. बसचं ब्रेक फेल झाल्यानं चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला. बस घाटात पलटी झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्याला सुरुवात केली.