नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे अमेरिकेतील सुपरमार्केटमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळतेय. केंद्र सरकारने तांदळाच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली. या निर्णयामुळे अमेरिकेतील सुपरमार्केटमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.
बासमती तांदळासह सर्व प्रकारच्या तांदळाच्या धोरणात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे अन्न मंत्रालयाचे म्हणणे आहे. केवळ बिगर बासमती तांदळाची निर्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारताच्या या निर्णयाचा परिणाम अमेरिकन बाजारांमध्ये दिसून येत असून सोशल मीडियावर याचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहे.
அமெரிக்காவாம்.. மோடிக்கு ஜே போட்ட கையோட அரிசிக்கு அடிச்சிக்க்கிட்டு சாகுறானுக சங்கிக.????
Sanghis are the real ‘Rice Bag’ கூட்டம்.. ???????? pic.twitter.com/wr34ieYLGi
— பரம்பொருள் (@paramporul) July 22, 2023
तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातल्याने जगातील अनेक देशांमध्ये तुटवडा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या दरातही वाढ होणार आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेतील लोक तांदूळ खरेदी करण्यासाठी सुपरमार्केटबाहेर प्रचंड गर्दी करत आहेत. तांदूळ खरेदीसाठी रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. भारत हा तांदळाचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. देशातील किमती कमी करण्यासाठी भारत सरकारने हा निर्णय घेतला आहे.
ஒரு மூட்டை அரிசிக்கு மேல நீ வாங்குற ஒவ்வொரு மூட்டையும் இன்னொருத்தர் உணவு. pic.twitter.com/VgGTrbPTOR
— ITPaiyan (@NalaiyaVivasayi) July 22, 2023