अहमदाबाद । गुजरातमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेक शहरांमध्ये पाणी साचलं असून यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणं कठीण झालं.दरम्यान, सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ समोर येत आहेत, ज्यामध्ये गॅस एजन्सीच्या गोदामात ठेवलेले सिलिंडर आणि रस्त्यावर पार्क केलेली वाहनेही पाण्यात बुडाल्याचे पाहायला मिळत आहे.
The Gujarat model .
Massive flash floods in Gujarat's #Junagarh. . pic.twitter.com/7EA6DOM4Xy
— Surbhi (@SurrbhiM) July 22, 2023
छतापर्यंत पाणी गेल्याने हे सिलिंडर पाण्यात तरंगू लागले आहेत. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला असून काही अनुचित प्रकार घडण्याची भीतीही लोकांना वाटत आहे.
Due to heavy rains in Gujarat's Navsari, gas cylinder were seen flowing in a strong current from the gas godown.#Navsari #Heavyrainfall #Gujarat #rainalert pic.twitter.com/WclsVtRTzl
— Azaz mogal (News today digital) (@azaz_mogal) July 22, 2023
मिळालेल्या माहितीनुसार, नवसारीत अवघ्या 4 तासांत 13 सेंटीमीटर पाऊस झाल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरले आहे. अनेक ठिकाणी तर वाहने आणि जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. हवामान खात्याने भावनगर, नवसारी, वलसाड आणि जुनागडसाठी अलर्ट जारी केला आहे.