पाचोरा – येथील जारगाव चौफुलीजवळ कुत्र्यांची झुंड अचानक मोटार सायकलच्या चाकामध्ये आल्याने युवकाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. प्रभू राजाराम सुसे ( रा. पाटीलवाडा, महादेव गल्ली, भडगाव) असे मृत मोटारसायकल स्वाराचे नाव आहे.
प्रभू सुसे हा कामानिमित्त मोटर सायकल (एमएच 19 सीसी 2496) ने जारगाव चौफुलीमार्गे जात असतांना समोरून अचानक कुत्र्यांची झुंड मोटार सायकलच्या चाकामध्ये आल्याने युकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी घसरून युवकाचा जागीच मृत्यू झाला. चौफुलीवर जवळ असलेल्या मास व चिकन विक्रेते परिसरात उघड्यावर मोठ्या प्रमाणात घाण टाकतात त्यामुळे तेथे फेकलेले मास खाण्यासाठी कुत्र्यांचा नेहमी वावर असतो.नेहमीच मास खाण्यावरून कुत्र्यांच्या येथे झुंज पाहायला येते. मासविक्रेत्यांच्या हलगर्जीपणाचा बळी गेल्याचे बोलले जात आहे.
प्रभू सिरसे हा भडगाव न्यायालयात शिपाई म्हणून कार्यरत आहे. घटना घडल्यानंतर बबलू मराठे यांनी अपघात झालेल्या व्यक्तीला तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यात मृत्यू घोषित करण्यात आले आहे. मयतास पश्चात आई-वडील, भाऊ-बहीण असा परिवार आहे.