पाचोरा,(प्रतिनिधी)- पाचोरा व भडगाव तालुका व शहरात विविध विकास कामांसाठी 49 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या कामांना त्वरित पूर्ण करण्याची असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आमदार किशोर पाटील यांनी मार्केट कमिटीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी गणेश पाटील , संजय गोहिल, शरद पाटे, सुनील पाटील, प्रकाश पाटील ,प्रवीण पाटील, प्रवीण ब्राह्मणे आदि उपस्थित होते.
आमदार किशोर पाटील यांनी सांगीतले की पाचोरा व भडगाव तालुका व शहर भागात 49 कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी मिळाली आहे. त्यात पाचोरा तालुक्यातील संघवी कॉलनी, दामजी नगर ,हनुमान नगर, राष्ट्रीय महामार्ग जोड रस्ता, प्रभाग तीन मधील रस्ते, पुनगाव रोड, चिंतामणी कॉलनी , जिजामाता कॉलनी, स्वामी समर्थ नगर ,कृष्णापुरी, प्रेम नगर, शासकीय विश्रामगृह ,पंचमुखी हनुमान चौक, पवन नगर ,स्वामी समर्थ नगर, अरिहंत नगर ,विकास कॉलनी, गांधीनगर येथे रस्ते कॉंक्रिटीकरणाची कामे तसेच नगरपालिकेच्या थेपडे व्यापारी संकुल पहिल्या मजल्यावर गाळे बांधकाम करणे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पाचोरा येथे तलाठी कार्यालय बांधकाम . शेवाळे -खडकदेवळा , नगरदेवळा- तारखेडा- गाळण रस्त्यावर लहान पूल बांधणे, बाळद – लोहटार रस्त्यावर पुलाची पुनर्बांधणी, कोल्हे – आंबेवडगाव, दुसखेडा- परधाडे , पाथर्डी- घुसर्डी रस्त्यावर पूल बांधणे, होळ फाटा येथे पाईप मोरीचे काम, दहिगांव संत गावाजवळ गिरणा नदीवर पाईप मोरीचे बांधकाम तसेच गौण खनिज योजनेअंतर्गत पुनगाव, जारगाव येथे रस्ते कॉंक्रिटीकरण, महादेवाचे बांबरुड येथे नळकांडी पूल, अंतुर्ली खुर्द, वाणेगाव, चिंचखेडा येथे रस्ता कॉंक्रिटीकरण. निंभोरी तांडा ते सुकळेश्वर रस्त्यावर पाईप मोरी,राजुरी बुद्रुक व खुर्द, आसनखेडा बुद्रुक व खुर्द ,तारखेडा बुद्रुक, शिंदाड येथे रस्ता काँक्रीटीकरण, टाकळी ते कजगाव नदीवर नळकांडी पुलाचे बांधकाम करणे. नांद्रा, वडजी,होळ, अंतुर्ली बुद्रुक, नेरी वाणेगाव, खडकदेवळा, शिंदाड, तारखेडा बुद्रुक , गाळण खुर्द, आंबेवडगाव वरखेडी, वडजी, वडगाव, कोठली, शिवनी व आडळसे येथे अत्याधूनिक अंगणवाडी खोल्या बांधणे या कामांना मंजुरी मिळाली आहे.
भडगाव तालुक्यात नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत 11 कोटींची कामे होणार असून त्यात नगरपालिकेच्या वार्ड 3 मध्ये वडधे फाटा ते जुने वडधे गांव रस्त्याचे कॉंक्रिटीकरण व भडगाव येथे तलाठी कार्यालय बांधणे. पारोळा- तरवाडे रस्त्यावर पूल बांधणे, तरवाडे – पळासखेडे रस्त्यावर पाईप मोरी, वाडे -गोडगाव -कनाशी तसेच खेडगाव- जुवार्डी रस्त्यावर पुलाचे बांधकाम करणे. दोन्ही तालुक्यात अशा 49 कोटी रुपये खर्चाच्या विकास कामांना मंजुरी मिळाली असून ही कामे लवकर पूर्ण करणार असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगीतले.
बनावट खतां संदर्भात ते म्हणाले की, खत तयार करणाऱ्या कंपनीलाच याबाबत दोषी धरण्यात यावे .होलसेल अथवा किरकोळ विक्रेते यांचा यात कोणताही दोष नसतो. सरकार यासंदर्भात समिती करून कायदा करणार आहे. त्यात व्यापारी प्रतिनिधी घेण्यात यावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करुन शेतकऱ्यांना न्याय मिळवुन देणार असल्याचे सांगीतले.
पाचोरा शहरातील पंचमुखी हनुमान चौक ते परधाडे नाक्यापर्यंतचा रस्ता विकसित होत असून त्यासाठी निधीही उपलब्ध झाला आहे. भविष्यात होणारा रिंग रोड विचारात घेऊन या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामूळे रहिवाशांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घ्यावे व नगरपालिकेची कारवाई टाळावी असे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी केले.