जळगाव | गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बोगस बियाणे आणि खते वितरीत केली जात आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांचे उभं पीक हे जमिनधोस्त होताना दिसत आहे. तर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. यावरून राज्य शासनाने आता कडक पावले उचलली आहेत.
तर जे बोगस खते आणि बियाणे वितरित करतात त्यांच्यावर चाप लावण्यासाठी शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून लवकर कायदा केला जाईल अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. याबाबत माहिती देताना महाजन यांनी, जळगाव जिल्ह्यामध्ये बोगस खते व बियाणे वाटप केल्याप्रकरणी हजारो शेतकऱ्यांचं नुकसान झालं. या संदर्भात महाजनांनी कॅबिनेटमध्ये मुद्दा उपस्थित केला होता. त्यावरून दोषींवर कडक कारवाई करण्यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
हे सुद्धा वाचा…
जळगाव जिल्ह्यातील दोघांवर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबध्दतेची कारवाई
आज जळगावसह या जिल्ह्यात मुसळधारची शक्यता ; शासनाकडून नागरिकांनी सतर्कतेच इशारा
मुख्यमंत्र्यांनी ना. गुलाबराव पाटलांकडे सोपविली या खात्याची अतिरिक्त जबाबदारी
तर या समितीमध्ये मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा समावेश असल्याचे देखील त्यांनी म्हटलं आहे. तर यावेळी महाजन यांनी हे बोगस खते आणि बियाणे गुजरातमधून येत असल्याचे देखील त्यांनी म्हटलं आहे.