पुणे : राज्यात मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना थांबता थांबत नाहीय दिवसेंदिवस या घटना वाढतच चालल्या आहेत. याच दरम्यान, आणखी एक धक्कादाक घटना समोर आलीय. अल्पवयीन मुलीला पॉर्न व्हिडीओ दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर आरोपीने पीडितेवर बलात्कार तर केलाच पण तिला गर्भनिरोधक गोळ्या देऊन असेच कायम संबंध ठेव अशी धमकी देखील दिली. पुणे पोलिसांनी याप्रकरणात कारवाई केली फिर्यादी तरुणीच्या तक्रारीवरुन आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी मुलगी पोलीस अकादमीत ट्रेनिंग घेत होती. त्याच ठिकाणी आरोपीदेखील ट्रेनिंगला होता. ट्रेनिंगदरम्यान दोघांची एकमेकांशी ओळख झाली. यातून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे.
हे पण वाचा..
आता अजितदादांची फाईल उपमुख्यमंत्र्यांच्या नजरेखालून जाणार ; गुलाबराव पाटलांचं मोठं विधान
फोटोचा नाद जीवावर बेतला ; समुद्राच्या लाटांमध्ये पत्नी गेली वाहून.. थरकाप उडवणारा VIDEO पहा
एकनाथ खडसेंचा आमदार मंगेश चव्हाणांविरूद्ध अब्रुनुकसानीचा दावा
चोरीच्या सहा दुचाकीसह दोन अल्पवयीन मुलांना अटक ; जळगाव शहर पोलिसांची कारवाई
असे असताना आरोपीने माझ्या इच्छेविरोधात मला लॉजवर नेऊन पॉर्न व्हिडीओ दाखवले आणि बलात्कार केल्याची फिर्याद तरुणीने दाखल केली आहे. शारीरिक संबंध ठेवल्यानंतर आरोपी अनवॉन्टेड ७२ ही गर्भनिरोधक गोळी खायला देत असे.
यानंतर पोलिसांनी 35 वर्षीय तानाजी कांबळेविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तो मूळचा कोल्हापुरच्या आजरा जिल्ह्यातील कुतूर गावचा आहे. सहकारनगर चे पोलीस उपनिरीक्षक राजगुरू यासंदर्भात अधिक तपास करीत आहेत.