जळगाव : सध्या फसवणुकीच्या घटना प्रचंड वाढल्या आहे. विविध माध्यमातून फसवणूक केली जात आहे. अशातच जळगावमध्ये तरुणाशी लग्न करुन त्याची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जळगाव शहरातील एका तरुणाने जिच्यासोबत सात फेरे घेतले, ती निघाली महिला नाही, तर तृतीयपंथीय असल्याचे समोर आल्यानंतर तरुणाच्या पायाखालची जमीनच सरकली.तरुणाने न्यायालयात धाव घेत तक्रार केल्यावर या प्रकरणी बुधवारी सुनावणी झाली. जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार तरुणाची फसवणूक करणाऱ्या तृतीयपंथीवर रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणाने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, जळगाव शहरातील गिरणा पंपीगरोड परिसरात वास्तव्यास असलेला तरुणाला फेसबुक अकाउंटवर १४ एप्रिल रोजी दिव्या पाटील नावाच्या तरुणीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. चेतनने ती स्वीकारली. त्यानंतर त्यांचे बोलणे सुरू झाले. एकमेकांच्या परिवाराविषयी त्यांनी माहिती घेतली. यात दिव्या नावाच्या संबंधित तरुणीने, माझे आई-वडील वारले असून मी खोटे नगरला एकटीच राहते, शेअर मार्केटच्या व्यवसायातून पैसे कमावते, तसेच जळगावच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे लॅबला कामाला असल्याचे तरुणाला सांगितलं. याच ओळखीचा फायदा घेत तरुणीने तरुणासोबत लग्न करण्याचा तगादा लावला.
हे सुद्धा वाचा..
आधी प्रेम, मग शरीरसंबंध सुरु, पण.. प्रेम कहाणीचा धक्कादायक शेवट
हतनुर धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात येणार : नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
मुंबईत १३ जुलैपर्यंत जमावबंदी लागू : हे आहे कारण?
हिरव्या मिरचीचे इतके फायदे जाणून तुम्ही तिची तिखटपणा विसराल ; जाणून घ्या फायदे
त्यानुसार तरुणाने ही बाब त्याच्या नातेवाईकांना कळविली, नातेवाईकांनी दोघांना बोलावून घेतले. याठिकाणी तरुणी दिव्या हिने तरुणाला त्याच्या वाढदिवशी म्हणजेच २९ एप्रिलला लग्न करायचे असल्याचे सांगितले. त्यानंतर २९ एप्रिल रोजी तरुणाचा आणि तरुणी दिव्या यांचा धार्मिक पद्धतीने गिरणा पंपिंग रोड मधील नगरातच विवाह पार पडला.
लग्नानंतर नवदांपत्याचे देवदर्शन झाले. सर्व विवाह संस्कार पांरपरिक पद्धतीने झाले. पाटकर कुटुंबाचा आनंद गगनाला भिडला असतानाच अचानक त्यांच्या आनंदावर विरजण पडले. लग्न करून आणलेली व्यक्ती मुलगी नसून ती चक्क तृतीयपंथी असल्याचे समजल्यावर पाटकर कुटुंबीयांना धक्का बसला व त्यांनी मदतीसाठी पोलिस ठाणे व न्यायालयात धाव घेतली. त्यानुसार बुधवारी न्यायालयाने सुनावणी करुन महिला असल्याचा बनाव करणाऱ्या तृतीयपंथीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश काढले.