नवी दिल्ली । शेअर बाजारात प्रचंड तेजी आली असून आज आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी वाढ झाली असून शेअर बाजाराने नवा सार्वकालिक उच्चांक तयार केला आहे.
आज सेन्सेक्स 65,168 च्या पातळीवर पोहोचला आहे. त्याचवेळी निफ्टीनेही 19,318 चा स्तर गाठला. तत्पूर्वी, सेन्सेक्स 118 अंकांच्या वाढीसह 64,836 च्या पातळीवर उघडला. निफ्टीही 57 अंकांनी वाढून 19,246 वर उघडला. सुरुवातीच्या व्यापारादरम्यान, सेन्सेक्सच्या 30 समभागांपैकी 21 शेअर्समध्ये वाढ होत आहे आणि 9 मध्ये घट होत आहे.
बाजारातील तेजीची 5 कारणे
महागाई कमी झाल्याने बाजाराला आधार मिळाला आहे.
कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यामुळे.
डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने बाजाराला आधार मिळाला आहे.
विदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारपेठेत गुंतवणूक वाढवत आहेत.
भारताच्या परकीय चलन साठ्यात वाढ झाल्याने बाजारालाही बळ मिळाले आहे.
या वर्षी आतापर्यंत बाजारात 6% पेक्षा जास्त वाढ
या वर्षी आतापर्यंत बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली. वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 2 जानेवारीला (बाजार 1 जानेवारीला बंद होता) सेन्सेक्स 61,167 च्या पातळीवर होता, जो आता (3 जुलै) 65,0858 अंकांवर पोहोचला आहे. म्हणजेच, या वर्षी आतापर्यंत त्यात 6% पेक्षा जास्त म्हणजेच 3,918 अंकांची वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते ही तेजी आणखीही कायम राहू शकते.