मुंबई । राज्याच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली असून अजित पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये पहिली महिला मंत्री म्हणून आदिती तटकरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. एकीकडे या सगळ्या घडामोडी सुरु असताना आता या राजकीय घडामोडींवर पुन्हा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी मोठा दावा केला आहे.
हे पण वाचा..
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी : अजित पवार घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ?
अजित पवारांसोबत कोणी कोणी घेतली शपथ? वाचा ..
यावेळी पपई खाल्ल्याने आरोग्याला होतात अनेक फायदे ! घ्या जाणून..
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. ज्या नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. अजित पवार यांच्यासोबत जेवढे गेले आहेत त्यातील 80 टक्के आमदार परत येणार आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून करण्यात आला आहे.
अनेक आमदार आज संध्याकाळपर्यंत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निवासस्थानी आता कार्यकर्ते जमू लागले आहेत. त्यामुळे पडद्यामागे मोठ्या हालचाली घडत असल्याचे संकेत मिळत आहे.