मुंबई – केंद्र सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रापाठोपाठ आता राज्य शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली आहे. सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यासाठी चार टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, सरकारी नोकरदारांना आणखी पगार वाढून मिळणार आहे. राज्य सरकारने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला
केंद्राने ३ एप्रिल २०२३ रोजी महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३८ टक्क्यांवरुन ४२ टक्के झालेला आहे.
हे पण वाचा..
..म्हणून अपघात झाला असावा ; बस अपघाताबाबत गिरीश महाजनांना शंका, काय म्हणाले पहा..
एलपीजी सिलिंडरचे नवीन दर जाहीर ; जाणून घ्या स्वस्त झाला की महाग
किंचाळ्या, आक्रोश पण.. बुलढाण्यात खासगी बसला आग लागून 25 जणांचा मृत्यू
कामाची बातमी! आजपासून हे मोठे नियम बदलले, थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल
त्यांनतर आता राज्य सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. १ जानेवारी २०२३ पासून ही वाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्याचबरोबर शासकीय कर्मचाऱ्यांना गेल्या पाच महिन्यांची थकबाकीही रोखीने देण्यात येणार आहे. वित्त विभागाने त्यासंबंधीचा शासन आदेश शुक्रवारी सृत केला. राज्यातील १७ लाख शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे.