बुलढाणा । बुलढाण्यातील समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजा जवळ पिंपळखुटा येथे हा अपघात झाला. बस पलटी होताच आग लागली अन् या आगीत २५ जणांचा होरपळून अंत झाला आहे. बसचे चालक, वाहक वाचले आहेत. मात्र या अपघाबाबत राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी शंका व्यक्त केली आहे.
चालकाला झोप लागली असल्यानं अपघात घडला असावा, असं महाजन म्हणाले. ‘चालकाला डुलकी लागल्यानं अपघात झाला असावा असं प्रथमदर्शनी दिसत आहे. टायर फुटल्यानं अपघात झाल्याचं काही जण म्हणत आहेत. पण टायर फुटल्याच्या किंवा तो घासला गेल्याच्या कोणत्याही खुणा रस्त्यावर दिसत नाहीत,’ असं महाजन यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यावर सांगितलं.
हे पण वाचा..
एलपीजी सिलिंडरचे नवीन दर जाहीर ; जाणून घ्या स्वस्त झाला की महाग
किंचाळ्या, आक्रोश पण.. बुलढाण्यात खासगी बसला आग लागून 25 जणांचा मृत्यू
कामाची बातमी! आजपासून हे मोठे नियम बदलले, थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल
सुवर्णसंधी! ‘या’ बँकेत विविध पदांच्या 183 जागांवर भरती, पात्रता जाणून घ्या..
बसच्या चालकाला डुलकी लागली असावी. त्यामुळेच बस लोखंडी खांब्याला धडकली. मग ती दुभाजकावर आदळली आणि नियंत्रण सुटून डाव्या बाजूला उलटली. बसच्या डाव्या बाजूला असलेली डिझेल टाकी फुटली. स्फोट झाल्यानं प्रवासी होरपळले, असं महाजन म्हणाले. बस जिथे पडली होती, त्या भागात रस्त्यावर डिझेल सांडल्याचं दिसत आहे, असं निरीक्षण महाजन यांनी नोंदवलं.