नवी दिल्ली : दर महिन्याच्या पहिल्याच दिवशी तेल आणि वायू विपणन कंपन्या घरगुती आणि व्यावसायिक गॅसचे नवे दर जाहीर करतात. त्यानुसार आज जुलै महिन्याचा पहिल्या दिवशी तेल कंपन्यांकडून गॅस सिलिंडरचे दर जाहीर करण्यात आलेले असून आज एलपीजी सिलिंडरचे नवीन दर जारी करण्यात आले आहेत. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार १४.२ किलो एलपीजी सिलिंडर आणि १९ किलो व्यावसायिक (कमर्शियल) सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
अशाप्रकारे आज देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये स्वयंपाकघरातील वापरासाठी एलपीजी सिलिंडरची किंमत ११०३ रुपये आणि व्यावसायिक वापराच्या सिलिंडरची किंमत १७७३ रुपये आहे. जून महिन्यात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत ८३ रुपयांनी कमी झाली होती तर मे महिन्यातही व्यावसायिक सिलिंडर १७२ रुपयांनी स्वस्त झाले होते.
हे पण वाचा..
किंचाळ्या, आक्रोश पण.. बुलढाण्यात खासगी बसला आग लागून 25 जणांचा मृत्यू
कामाची बातमी! आजपासून हे मोठे नियम बदलले, थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल
सुवर्णसंधी! ‘या’ बँकेत विविध पदांच्या 183 जागांवर भरती, पात्रता जाणून घ्या..
याशिवाय देशाची आर्थिक राजधानी मुंबईत एलपीजी सिलिंडरची किंमत ११०२.५० रुपये तर व्यावसायिक सिलेंडरचा भाव १७२५ रुपयांवर स्थिर आहे. तसेच इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, चेन्नईमध्ये एक एलपीजी एलपीजी सिलिंडर १११८.५० रुपयांना विकला जात असताना व्यावसायिक १९३७ रुपयाला विक्री होत आहे. सिलिंडरच्या किमतीत गेल्या वर्षभरात चढउतार पाहायला मिळाले आहेत.
गेल्या महिन्यापासून घरगुती सिलेंडरचे दर स्थिर
गेल्या वर्षी 6 जुलै रोजी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत बदल करण्यात आला होता. देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत मार्चपर्यंत 1053 रुपये होती, त्यात 50 रुपयांनी वाढ झाली होती आणि आता घरगुती सिलेंडर 1103 रुपये प्रति सिलेंडर विकला जात आहे. त्यामुळे घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर गेल्या एक वर्षापासून स्थिर आहेत.