जळगाव । शहरातील स्वस्त धान्य दुकान क्रमांक ९, वॉर्ड क्रमांक २/१, शिवाजी नगर, (जळगाव) येथील स्वस्त धान्य दुकानाचा हा परवाना निलंबित करण्यात आला आहे. समाजमाध्यमात गैरसमजाचे संदेश पसरविल्याने जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड यांनी ही कारवाई केली
नेमकं प्रकरण काय?
स्वस्त धान्य दुकान परवानाधारक नवनाथ विश्वनाथ दारकुंडे यांनी ‘शासन आपल्या दारी’ या शासकीय कार्यक्रमाच्या नावाखाली व्हॉट्सअप ग्रुपवर २७ जूनला मुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमास सर्व कार्डधारकांना हजर राहणे बंधनकारक आहे व जे रेशन कार्डधारक या कार्यक्रमास हजर राहणार नाहीत, त्या कार्डधारकांचे धान्य तीन ते चार महिने बंद करण्यात येईल, असा धमकी वजा इशारा दिलेला होता.
हे पण वाचा..
LPG सिलिंडर ते क्रेडिट कार्डपर्यंत, १ जुलैपासून होणार हे मोठे ५ बदल, घ्या जाणून..
महाराष्ट्राला हादरवणारी घटना! म्हणून पत्नीला जिवंत जाळलं, धक्कादायक बाब उघड
खुशखबर! महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीमध्ये मेगाभरती जाहीर
राज्य सरकारची शिधापत्रिकाधारकांना भेट! मिळणार 5 लाखांचा लाभ, जाणून घ्या कसं
या कार्यक्रमात कार्डधारकांना महत्त्वाच्या सूचना देणार आहेत व तेथे कार्डधारकांची सर्वांची नोंद घेतली जाईल, त्यामुळे सर्व ग्राहकांनी हजर राहणे अनिवार्य आहे. शासन आपल्या दारी या कार्यक्रमांच्या नावाखाली व्हॉट्सअप ग्रुपवर लाभार्थ्यांमध्ये दिशाभूल निर्माण करणारे मेसेज टाकलेले आहे.
मात्र, शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमास लाभार्थ्यांना उपस्थितीची सक्ती नसतानाही समाजमाध्यमात गैरसमजाचे संदेश पसरविल्यामुळे नवनाथ विश्वनाथ दारकुंडे यांच्या स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड यांनी निलंबित केला आहे. दारकुंडे यांच्या रेशन दुकानातून धान्य वितरण न करणे याबाबत तक्रारी पूर्वीच आल्या होत्या.