जळगाव दि २९ – डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय परिसरातील निवासी तज्ञ डॉक्टर आणि प्रशासन अधिका—यांनी आणि विद्यार्थ्यांनी आगळया वेगळया पध्दतीने आषाढी एकादशी आनंदात साजरी केली. आषाढी एकादशी निमित्ताने ईशांन्वी आशिष भिरूड व लिपाक्ष पाराजी बाचेवार या चिमुकल्यांनी विठ्ठल व रूक्मीणीची वेशभूषेत परिसरातील दिंडीत सहभाग नोंदवला. टाळांच्या गजरात वातावरण भक्तीमय बनवले. यावेळी सर्व निवासी वैद्यकिय तज्ञ, अधिकारी आणि इतर मान्यवर वारकरी मंडळी अशा पोषाखात उपस्थीत होते.उपस्थीत होते.
चिमुकले विठ्ठल व रूक्मीणी ईशांन्वी आशिष भिरूड व लिपाक्ष पाराजी बाचेवार यांचे पूजन करण्यात आले. परिसरातील बालगोपालांनी देखिल यावेळी आनंद लुटत सहभागी झाले. हरी नामाच्या गजरात, पांडुरंगाच्या नामाच्या गजरात दिंडीची वारी निघाली .विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल म्हणत ही वारी वैद्यकिय महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये नाचत होती . पाऊली खेळत होती. अशा प्रकारे हा दिंडी सोहळा डॉ. उल्हास पाटील महाविद्यालयाच्या दारी अतिशय आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला.