महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत मेगाभरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या भरती अंतर्गत तब्बल 3129 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल आणि काही पदांसाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2023 आहे.\
ही पदे भरली जाणार?
या मेगापदभरती अंतर्गत ”कार्यकारी संचालक (प्रकल्प), मुख्य अभियंता (पारेषण), अधीक्षक अभियंता (पारेषण) महाव्यवस्थापक (वित्त व लेखा), कार्यकारी अभियंता (पारेषण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण), उपकार्यकारी अभियंता (पारेषण), सहायक अभियंता (पारेषण), सहाय्यक अभियंता (दूरसंचार), वरिष्ठ तंत्रज्ञ (ट्रान्स सिस्टम) तंत्रज्ञ-I (ट्रान्स सिस्टम), तंत्रज्ञ-II (ट्रान्स सिस्टम), सहाय्यक तंत्रज्ञ (सामान्य), सहायक तंत्रज्ञ (सामान्य), टंकलेखक (मराठी)” ही विविध पदे भरली जाणार आहेत.
कार्यकारी संचालक (प्रकल्प), मुख्य अभियंता (पारेषण), अधीक्षक अभियंता (पारेषण), महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तसेच, इतर पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे
हे सुद्धा वाचा..
ITBP मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी बंपर भरती सुरु ; तब्बल 69100 पगार मिळेल..
बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत एक लाख रुपये पगाराच्या नोकरीची संधी! पात्रता जाणून घ्या..
Railway Job : परीक्षेशिवाय रेल्वेत 3624 पदांची मेगाभरती ! 10वी+ITI पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी..
बाल विकास प्रकल्प अधिकारी जळगाव येथे बंपर भरती ; 12वी पाससाठी सुवर्णसंधी..
ऑफलाईन पध्दतीसाठी उमेदवारांनी आपला अर्ज –
शासकीय मुख्य महाव्यवस्थापक (एचआर), महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड, प्रकाशगंगा, ई-ब्लॉक, प्लॉट नंबर, सी-19, 7 वा मजला, एचआर विभाग, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (ई), मुंबई-400051 (कार्यकारी संचालक (प्रकल्प), मुख्य अभियंता (पारेषण), अधीक्षक अभियंता (पारेषण), महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) या पत्यावर पाठवावा. तर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी खाली लिंक उपलब्ध करून दिली आहे.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार डिप्लोमा, बारावी किंवा ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतला असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी असणं आवश्यक आहे.