मुंबई । महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची बातमी समोर आली असून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना कोर्टाने समन्स बजावले आहेत.मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून हे समन्स बजावण्यात आलं आहे. दोघांनाही 14 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे कोर्टाच्या समन्सवर आता ठाकरे गटाकडून काय भूमिका मांडली जाते ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
हे पण वाचा..
रोहिणी खडसेंना तालुका पोलीसांनी घेतले ताब्यात, नेमकं कारण काय?
खडसे अन् गुलाबराव पाटलांमध्ये झाला समझोता ; अखेर ‘तो’ खटला घेतला मागे
धक्कादायक! पोलीस कर्मचाऱ्याने रागात विजेच्या डीपीत हात घातला अन्… घटना CCTV कैद
धक्कादायक! पाचोऱ्यात प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या
काय आहे नेमकं प्रकरण?
सामना या वृत्तपत्रामध्ये आपल्याबद्दल बदनामीकारक मजकूर छापण्यात आल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केला होता. याविरोधात त्यांच्याकडून मानहानीची याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आलं आहे.
येत्या 14 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.