पाचोरा -भडगाव विधानसभा मतदार संघात कार्यसम्राट आमदार किशोरआप्पा पाटील यांनी केंद्र व राज्य स्तरावर माझा नेता व निर्णय कोणताही असो परंतू मतदार संघाचा विकास हे एकमेव लक्ष डोळ्यासमोर ठेवून आमदार किशोरआप्पा पाटील यांनी जात-धर्म-पक्ष-संघटना गट-तट याचा कोणताही विचार न करता मतदार संघात सार्वजनिक असो की वैयक्तिक असो 24 × 7 कामे करण्याची धडाकेबाज मोहिम हाती घेतली आहे.
प्रत्येक आठवड्याला मुंबईच्या दौर्याच्या माध्यमातून आमदार किशोरआप्पांनी मतदार संघात विकास कामे आणली आहेतच. पर्यायाने मतदार संघात ज्या भागात नजर मारली जाईल त्या भागात काही ठिकाणी विकासकामे झाली आहेत तर काही प्रगतीपथावर आहे. अर्थात यासाठी त्यांना शासकीय अधिकारी व कर्मचार्यांचे तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर सहकार्य लाभत आहे.
पाचोरा शहराचा विचार केला तर शहराच्या प्रत्येक भागात कोणते ना कोणते काम झाले आहे तर काही ठिकाणी सुरू आहे. विशेष बाब म्हणजे कामाची गुणवत्ता जोपासत नजर लागेल अशी क्वॉलिटीची कामे त्यांचे स्नेही रविभाऊ केसवाणी व एम.एस.पी.ग्रुप सारख्या कंपनीच्या माध्यमातून होत आहेत. अर्थात तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर सिंहाचा वाटा आमदार किशोरआप्पा पाटील यांचे सुपुत्र सुमितदादा किशोरआप्पा पाटील व भाचे समाधान पाटील यांचा म्हणावा लागेल. शहरामध्ये विविध विकास कामांचा विषय तर आहेच परंतू पाचोरा शहराच्या इतिहासात आजपर्यंत पाचोरा नगरपालिकेचे अनेक मुख्याधिकारी आलेत मात्र आठवडे बाजारासारख्या परिसरात साधी टपरी देखिल उचलण्याची हिंमत त्यांनी दाखविली नाही.
कारण हे तेवढेच सत्य आहे पाचोरा शहरात एकतेत समाजकंटकांच्या वादातून दोन धर्मियांमध्ये जी ठिणगी पडली त्याचा केंद्रबिंदू म्हणजे आठवडे बाजार आणि त्या ठिकाणी प्रत्येक जाती-धर्माच्या लोकांची व्यवसायाची दुकाने होती. अशा या परिसरात अतिक्रमण काढणे म्हणजे जिकरीचे तर होतेच सोबतच पाचोरा शहराच्या शांततेवर ठिणगी पडेल अशी स्थिती होती. परंतू पाचोरा शहराच्या विद्यमान मुख्याधिकारी शोभाताई बाविस्कर यांच्या अंगी असलेला शिक्षकी अनुभव व शिक्षण घेत असतांना शैक्षणिक मानसशास्त्राचा अभ्यास याचा मुख्याधिकारी बाविस्कर मॅडम यांनी पुरेपुर वापर करून गेल्या 4 महिन्यापासून अथक परिश्रम घेत होते. वेळेप्रसंगी आठवडे बाजारात जावून त्या दुकानदारांमध्ये बसून त्यांच्या समवेत साधक-बाधक चर्चा करणे तर कधी सर्व दुकानदारांना पाचोरा नगरपालिका मुख्याधिकारी दालनात बोलवून त्यांच्या विविध समस्या व प्रश्न जाणून त्यांचे समाधान होईल अशा स्वरूपाची चर्चा करणे विशेष म्हणजे वेळेप्रसंगी आठवडेबाजार परिसरातील ज्यांच्या मार्गदर्शनाखाली अंदाजे 4 कोटी 97 लाखाचे अतिभव्य असे पाचोरा शहराच्या हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक समजले जाणारे व्यापारी संकुल उभारले जात आहे. असे आमदार किशोरआप्पा पाटील यांचे स्नेही रविभाऊ केसवाणी यांना देखिल दुकानदारांसमवेत चर्चेसाठी बोलविले जात होते. रविभाऊ देखिल त्यांचे समाधान होईल अशी चर्चा झाल्याने परिणाम असा झाला की, पाचोरा शहराच्या इतिहासात नगरपालिका मुख्याधिकारी शोभाताई बाविस्कर यांनी आठवडेबाजार परिसरातील जे दुकानदार होते त्या दुकानदारांच्या समवेत स्वत: उभ राहून कोणत्याही पोलिस बंदोबस्ताचा सहभाग न घेता हसत-खेळत पावसाळ्याची चाहूल असतांना सदरची दुकाने काढण्यात यशस्वी झाले. अर्थात या दुकानदारांना जेव्हा सदरच्या हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक समजल्या जाणार्या शॉपिंगमध्ये व्यवसायाचा आनंद येईल त्यावेळेस निश्चीतच शॉपिंग उभारण्यासाठी कार्यसम्राट आमदार किशोरआप्पा पाटील, मुख्याधिकारी शोभाताई बाविस्कर अत्यंत क्वॉलिटीचे व नेत्रदिप ऐतिहासिक काम ज्यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे ते रविभाऊ केसवाणी यांचे नाव येणार्या भविष्य काळात कोणीही विसरू शकणार नाही.