Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भडगाव एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमार्फत १२वी उत्तीर्णांसाठी भरती

Editorial Team by Editorial Team
June 25, 2023
in जळगाव, शैक्षणिक
0
12 वी उत्तीर्ण महिलांसाठी सुवर्णसंधी..! राज्यातील या जिल्ह्यात 154 पदांवर बंपर भरती
ADVERTISEMENT
Spread the love

महिला व बाल विकास विभागातंर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना, भडगाव प्रकल्पात अंगणवाडी मदतनीस पदाच्या रिक्त जागा भरावयाच्या आहेत. या पदासाठी इच्छुक पात्र उमेदवारांकडून अर्ज भागविण्यात येत आहेत.
अर्ज फॉर्म विक्री व स्वीकृती कालावधी २३ जून ते ३ जुलै, २०२३ पर्यंत निश्चित केलेला आहे. अर्ज कार्यालयीत सकाळी ११.०० ते ५.०० वाजेपर्यंत रुपये दहा रोख देऊन मिळतील. अर्जदाराने अर्ज पूर्णपणे स्वहस्ते भरून स्वतः बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, भडगाव यांचे कार्यालयात ७ जुलै, २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत जमा करावयाचे आहेत. मुदतीनंतर अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

या पदासाठी इयत्ता १२ वी उत्तीर्ण अशी किमान शैक्षणीक पात्रता आवश्यक राहील. अर्जदाराने इ.१२ वी, पदवीधर व पदव्युत्तर. डि.एड., बी. एड. व शासकिय मान्यता संस्थेचे संगणक परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र (MS-CIT) या सर्व शैक्षणिक अर्हतेची गुणपत्रके जोडणे आवश्यक आहे. अर्जदाराने अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे साक्षांकित (खास करुन राजपत्रीत अधिका-यांची साक्षांकित केलेली) असलेल्या झेरॉक्स प्रती जोडणे आवश्यक आहे. (मुळ कागदपत्रे जोडू नयेत.)

उमेदवार हा स्थानिक रहिवाशी असणे आवश्यक आहे. ग्रामीण प्रकल्पातील अंगणवाडी मदतनीस या पदावर फक्त त्या गावातील (ग्रुप ग्रामपंचायत नव्हे तर महसुली गाव वाडी/वस्ती/पाडे त्या त्या क्षेत्रातील रहिवासी असतील त्यांना समजण्यात येईल. त्यासाठी स्थानिक रहिवासी पुरावा (ग्रामसेवकाचा दाखला / स्वयंघोषणापत्र जोडावे. उमेदवाराचे वय ७ जुलै, २०२३ रोजी किमान १८ व कमाल ३५ वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच विधवा उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा कमाल ४० अशी राहील. (शाळा सोडल्याचा दाखला जोडावा/१२वी पास प्रमाणपत्र जोडावे.) या पदावरील थेट व सरळ सेवेने नियुक्ती साठी लहान कुटुंबाची अटीचे पालन करणे आवश्यक राहील. ज्या अंगणवाडी केंद्रावर रिक्त पद आहे. त्या संबंधित केंद्रामध्ये ५० टक्के पेक्षा जास्त मुले मराठी भाषा इतर भाषा बोलणारी असतील तर अशा अंगणवाडी वरील पदावर इतर भाषेचे ज्ञान असलेल्यांचे (लिहीता वाचता येणे) अर्ज सिकारण्यात येतील, मात्र त्यांना मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. इतर भाषा (उर्दु, हिंदी, माडीया, गोड, कोकणी, पावरी, कन्नड, तेलगु, भिलोरी, बंजारा, वगैरे)
अंगणवाडी मदतनीस पदासाठी शासन नियमानुसार दरमहा मानधन देय राहील. या व्यतिरिक्त कोणतेही मानधन देय नाही. विधवा महिला व अनाथ उमेदवार असलेल्यांना १० अतिरिक्त गुण शासन देण्यात येतील तसेच अनुक्रमे संबंधीत तालुक्याचे तहसिलदार, जिल्ह्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आणि गट विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र/दाखला जोडल्यास अतिरिक्त गुण देण्यात देतील. मागासवर्गीय उमेदवार असल्यास (अनुसूचित जाती जमाती) यांना अतिरिक्त १० गुण देण्यात येतील व इतर मागास प्रवर्ग/विमुक्त जाती भटक्या जमाती/आर्थीक आर्थीक दृष्टया दुर्बल घटक/विशेष मागास प्रवर्ग यांना ५ गुण देण्यात येतील. अंगणवाडी सेविका/मदतनीस/ मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी २ वर्षाचा अनुभव असल्यास ५ अतिरिक्त गुण देण्यात येतील. सर्व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यांची छाननी केली जाईल त्यानंतरच उमेदवाराची प्राथमिक ज्यात शिक्षण, विधवा वा अनाथ, जात इ. त्याच्या प्रमाणपत्रावरून त्यांना निश्चित गुण देवून १० दिवसाच्या आत प्रसिध्द करण्यात येईल.

अर्जासोबत योग्य ती सर्व कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे. आवश्यक ती कागदपत्रे विहित कार्यपध्दतीतून सादर न केल्यास अर्ज निकाली काढण्यात येईल. अर्जासोबत जोडलेल्या झेरॉक्स प्रतीची नोंद क्रमाने अर्जाच्या शेवटच्या पानावर दिलेल्या जागी करावी. अपूर्ण भरलेला वा खाडाखोड केलेला अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. सदरच्या नेमणुका या अस्थायी स्वरुपाच्या व मानधनावर असून शासनास आवश्यकता भासणार नाही. त्यावेळेस कोणतीही पूर्व सुचना/ नोटीस न देता उमेदवारांची सेवा समाप्त करण्यात येईल. अंगणवाडी मदतनीस पदाच्या नेमणुका हया मानधनावर असुन त्यांना शासनाचे आदेशानुसार वेळोवेळी मंजूर असलेल्या मानधना व्यतिरिक्त जिल्हा परिषद अगर शासन सेवेच्या कोणत्याही सवलती असणार नाहीत. अर्जदाराने अर्ज घेतांना स्थानिक रहिवासी पुरावा आणावा. तसेच अर्जासोबत मुळ प्रमाणपत्रांच्या प्रती जोडू नये. अर्ज पोष्टाव्दारे स्विकारला जाणार नाही. (अर्ज समक्ष घ्यावा व दयावा), कुठल्याही कागदपत्रकाच्या झेरॉक्स प्रती अथवा दाखले हे जाहिरातीत दिलेल्या कालावधी नंतर स्विकारले जाणार नाहीत.

उमेदवाराने राजकिय दबाव अथवा इतर अन्य मार्गाचा (अथवा आर्थिक देवाण घेवाण) अवलंब केल्यास व तसे सिध्द झाल्यास भरती प्रक्रियेतून उमेदवारास वगळण्यात येईल. निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्यावर रिक्त पदांची संख्या, भरती प्रक्रियेचा कालावधी इ. बदलण्याचे सर्वस्वी अधिकार सदस्य सचिव तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी, भडगाव यांना आहेत

अंगणवाडी मदतनीस रिक्त पदे गावे याप्रमाणे भातखेडे-१, आमडदे-१, पिचर्डे-२, गुढे-३, नालबंदी-१, वडगाव बु-१, कोठली-१, बांबरुड प्र.ब-१, वाक-१, भोरटेक-उमदखेड-१, गिरड- २, कजगाव-१, माणकी-१, वडजी-२, बात्सर-१, गोंडगांव-१, पळासखेडा-१, अंजनविहारे-१, निंभोरा -१, पिंपरखेड-१, पिंपळगाव बु.-१, आंचळगाव धोत्रे-१, पथराड-१ असे एकूण २८ जागा भरावयाच्या आहेत. असे बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना, भडगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नवीन इंजिन अन् उत्तम मायलेजसह Honda ने लाँच केली बाईक ; जाणून घ्या किंमत 

Next Post

सोने खरेदी करण्याची उत्तम संधी..! जाणून घ्या किती स्वस्त झाले सोने

Related Posts

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

April 28, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

April 28, 2025
हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

April 28, 2025
जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

April 28, 2025
कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

April 28, 2025
Next Post
सोने खरेदीदारांसाठी खुशखबर..! वाचा आज कितीने घसरले सोने-चांदी?

सोने खरेदी करण्याची उत्तम संधी..! जाणून घ्या किती स्वस्त झाले सोने

ताज्या बातम्या

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

April 28, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

April 28, 2025
हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

April 28, 2025
जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

April 28, 2025
कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

April 28, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us