छतरपूर : सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न अनेक तरुण-तरुणी पाहत आहे. त्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. मात्र याच दरम्यान, गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला सुट्टी मिळत नसल्याने डेप्युटी कलेक्टरने थेट पदाचाच राजीनामा दिला आहे. त्यामुळे या महिला अधिकाऱ्याच्या राजीनाम्याची सध्या जोरात चर्चा सुरू आहे.
हे पण वाचा..
राष्ट्रवादीचा प्रस्ताव ! एकनाथ खडसेंनी लोकसभा निवडणूक लढवावी, पण कुठून??
आमदार महिलेला घेऊन हॉटेलवर पोहोचला, तितक्यात मागून नवरा आला अन्.. VIDEO व्हायरल
कृषी विभाग बुलढाणा अंतर्गत नोकरीची संधी.. दरमहा 20,000 पगार मिळेल
ग्राहकांसाठी खुशखबर..! सोने 600 रुपयांनी तर चांदी 2500 रुपयांनी घसरली
मध्यप्रदेशातील छतरपूर येथील हा प्रकार आहे. शा बांगरे असं या उपजिल्हाधिकारीचं नाव आहे. त्यांनी केवळ क्षुल्लक कारणावरून थेट नोकरीच सोडली आहे.सामान्य प्रशासन विभागाला पत्र लिहून तिने नोकरीचा राजीनामा दिला आहे. हे पत्र व्हायरल होत आहे.
या पत्रातून तिने धार्मिक भावनेला ठेच पोहोचल्याचं म्हटलं आहे. बांगरे यांनी घर घेतलं होतं. त्यामुळे तिने गृहप्रवेशाचं आयोजन केलं होतं. मात्र, त्यासाठी त्यांना सुट्टी देण्यात आली नाही. आपल्याच घराच्या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला सुट्टी मिळत नसल्याने बांगरे नाराज झाल्या. अस्वस्थ झाल्या. त्याच अस्वस्थतेतून त्यांनी थेट नोकरीचाच राजीनामा दिला आहे.