नंदुरबार : रजा रोखीकरणाची रक्कम काढून दिल्याच्या मोबदल्यात 45 हजारांची लाच घेताना वरीष्ठ लिपिकाला नंदुरबार एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे. विनोद साकरलाल पंचोली (50, गुजर गल्ली, नवापूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
नवापूर येथील 57 वर्षीय तक्रारदार यांनी नुकतीच स्वेच्छानिवृत्ती घेतली असून त्यांच्या रजा रोखीकरणाची रक्कम दि एन.डी.अॅण्ड एम.वाय.सार्वजनिक हायस्कूलच्या वरीष्ठ लिपिक विनोद पंचोली याने दिलेल्या धनादेशाद्वारे तक्रारदाराच्या बँक खात्यात नुकतीच जमा झाली.
हे पण वाचा..
म्हणून MPSC उत्तीर्ण दर्शना पवारचा खून केला ; कारण कारण ऐकून पोलिसही हादरले
..म्हणून एकनाथ खडसेंना न्यायालयाने ठोठावला दंड
राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 1500 कोटीचा निधी वितरित होणार : कोणत्या जिल्ह्याला किती मदत?
गूळ, तांदूळ, तीळ अन् हिरा..! पीएम मोदींनी आपल्या भेटवस्तूंनी जिंकलं जो बिडेनचं मन
मात्र हे काम करून देण्याच्या मोबदल्यात आरोपी विनोद पंचोली याने मंगळवार, 20 जून रोजी 45 हजारांची लाच मागितल्याने तक्रार एसीबीकडे नोंदवण्यात आली व सापळा रचण्यात आला. बुधवारी रात्री दहा वाजता आरोपीने आपल्या नवापूरातील गुजर गल्लीतील राहत्या घरातच तक्रारदाराकडून लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली. या कारवाईने शैक्षणिक वर्तुळातील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली.आरोपीविरोधात नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.