लांबणीवर पडलेला हा पाऊस येत्या दोन दिवसानंतर राज्यात बरसणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने वर्तवला आहे.यावर्षी एल निनो आणि बिपरजॉय चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मॉन्सून लांबणीवर पडला असून शेतकरी चिंतेत पडला आहे जून महिना संपत आला तरी पाऊस पडत नसल्याने तापमानात देखील वाढ झाली आहे.मात्र आता काहीसा दिलासा देणारा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून लांबणीवर पडलेला हा पाऊस येत्या दोन दिवसानंतर म्हणजेच २३ जून पर्यंत राज्यात बरसणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने वर्तवला आहे.
Regional rainfall forecast for 22-24 June by @RMC_Mumbai & @imdnagpur for Maharashtra
Dark blue; 76-100% stations recv rains (wide Spread) व्यापक
Light blue ~51-75% (Fairly wide spread) बऱ्यापैकी पसरलेला
Dark green~26-50% (scattered) बऱ्यापैकी
Light green 1-25% (Isolated) तुरळक pic.twitter.com/Eri7rf6lAX— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 20, 2023
दरवर्षी मॉन्सून ४ जूनच्या आसपास केरळमध्ये येतो तर ९ जून पर्यंत मॉन्सूनचे राज्यात आगमन होऊन १५ जूनपर्यंत संपूर्ण राज्य मॉन्सूनने व्यापले असते. मात्र, या वर्षी मॉन्सून येण्यास उशीर झाला आहे. हवामान विभागाने २३ जूनला पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.या वर्षी सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडेल, अशी शक्यता या पूर्वीच हवामान विभागाने वर्तवली आहे. जूनच्या शेवटच्या आठ ते दहा दिवसांत राज्यात चांगला पाऊस बरसेल.
नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीसाठी सध्या पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे राज्यात चांगला पाऊस येण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पुणे इथे पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.