पुणे : MPSC परीक्षेत राज्यात तिसऱ्या आलेल्या दर्शना पवार हिचा मृतदेह पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेह सापडल्यानंतर त्याचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. या पोस्टमॉर्टमचा अहवाल आला असून त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अहवालात काय?
दर्शना पवार हिचा मृत्यू सामान्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तिच्या डोक्यावर आणि शरीरावर जखमा आढळल्या आहे. यामुळेच तिचा मृत्यू झाला असल्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट केले आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट येतात पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या खून प्रकरणात दर्शनाचा मित्र राहुल दत्तात्रय हांडोरेवर संशयाची सूई जात आहे. तो दर्शनासोबत होता. परंतु अजूनही बेपत्ता असून त्याच्या शोधासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची पथके रवाना झाली आहे. दरम्यान, या मुलीसोबत असलेला तरुणीही बेपत्ता आहे.
नेमकी घटना काय?
दर्शना ९ जून रोजी पुण्यातील सत्काराच्या कार्यक्रमासाठी स्पॉट लाईट ॲकॅडमी येथे आली होती. ११ जून सायंकाळी चार वाजेपर्यंत घरच्या मंडळीच्या संपर्कात होती. मात्र १२ रोजी दर्शनाने फोन उचलले नाहीत. यामुळे कुटुंबियांनी स्पॉट लाईट ॲकॅडमी येथे येऊन तिची चौकशी केली. त्यावेळी सांगण्यात आले की, दर्शना ही त्याचा मित्र राहुल दत्तात्रय हांडोरे हिच्यासोबत सिंहगड आणि राजगड याठिकाणी फिरण्यासाठी गेली आहे. मात्र हे दोघेही संपर्कात नाहीत.