मुंबई : मूळ जळगावची असलेल्या अभिनेत्री मेघा धाडे (megha dhade) हिने आता राजकारणात एन्ट्री केली आहे. तिने चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. मेघाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिने ही माहिती चाहत्यांना दिली.
‘बिग बॉस मराठी’चं पहिलं पर्व गाजवणारी अभिनेत्री म्हणून मेघा धाडेला ओळखले जाते. ‘बिग बॉस’मुळे ती घराघरात पोहोचली. ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची ती विजेती होती. ‘बिग बॉस मराठी’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून त्या शोच्या पहिल्या दिवसापासून मेघा चर्चेत होती. विशेष म्हणजे आजही तिची चर्चा चाहत्यांमध्ये रंगते.
तिने आता राजकारणात एन्ट्री केली असून भाजपात प्रवेश केला आहे. यादरम्यान, तिने एक पोस्ट लिहिली आहे.
हे पण वाचा..
मोठी बातमी! शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्याच? कोणाला मिळणार संधी..
आजचा दिवस तुमच्या राशींसाठी शुभ की अशुभ जाणार? वाचा आजचे राशिभविष्य
नागरिकांनो सावधान! आणखी एका प्राणघातक विषाणूने दार ठोठावले, कोरोनापेक्षाही आहे घातक
सरकारची विवाहित महिलांसाठी जबरदस्त योजना, खात्यात येणार पूर्ण 5000 रुपये?
काय आहे मेघाची पोस्ट?
“नमस्कार वंदे मातरम ! मला आपणास सगळ्यांना कळवण्यास अत्यंत आनंद होतोय की , तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि शुभेच्छांनी मी माझा आवडता आणि जगातला सगळ्यात मोठा बलशाली पक्ष म्हणजेच भारतीय जनता पार्टीत रीतसर प्रवेश केला आहे . हे मी माझे अहोभाग्य समजते की काल ज्यांच्या उपस्थितीत माझी प्रवेश प्रक्रिया पार पडली ते भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब , महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विक्रांत जी पाटील , महामंत्री विजयजी चौधरी व सांस्कृतिक प्रकोष्टच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रियाताई बेर्डे यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने हा प्रवेश प्रक्रियेचा कार्यक्रम पार पडला. आता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली छान कामगिरी करून दाखवायचीआहे . समाजसेवेसाठी घेतलेल्या व्रताचे आता पुरेपूर पालन करायचे आहे. एका सुदृढ आणि सुशिक्षित सुसंस्कृत समाजाचं जे आपलं ध्येय आहे ते घेऊन आता जोमात कामाला लागायचा आहे , तेव्हा तुम्हा सगळ्यांचे ही आशीर्वाद आणि शुभेच्छा कायम माझ्यासोबत असू द्या हीच विनंती आणि अपेक्षा आहे . धन्यवाद .जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय.