मुंबई : गेल्या अनेक दिवसापासून शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरूय. त्यात शिवसेनेचा वर्धापन दिनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. अशातच उद्याच म्हणजेच रविवारी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे सरकारच्या नव्या मंत्रिमंडळ विस्तारात नेमकं कोणकोणत्या आमदारांना संधी दिली जाईल, याचीच उत्सुकता अनेकांना लागली आहे. दुसरीकडे मंत्रिमंडळात कुणाला स्थान मिळणार? याबाबत भाजप आणि शिंदे गटातील आमदारांची धाकधूक वाढली आहे.
हे पण वाचा..
आजचा दिवस तुमच्या राशींसाठी शुभ की अशुभ जाणार? वाचा आजचे राशिभविष्य
नागरिकांनो सावधान! आणखी एका प्राणघातक विषाणूने दार ठोठावले, कोरोनापेक्षाही आहे घातक
सरकारची विवाहित महिलांसाठी जबरदस्त योजना, खात्यात येणार पूर्ण 5000 रुपये?
नव्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप आणि शिवसेनेकडून कोणाकोणाला संधी द्यायची आणि सध्या असलेल्या पैकी कोणाला वगळायचे याबाबत आज चर्चा होऊन निर्णय होऊ शकतो, असा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे आता आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चित्र स्पष्ट होईल अशी शक्यता आहे.
दरम्यान, आज संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाणार असल्याची माहिती आहे. दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार आहे. या भेटीत मंत्रिमंडळ विस्ताराबात चर्चा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे उद्या म्हणजेच रविवारी सायंकाळी छोटेखानी मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा होणार असा अंदाज बांधला जात आहे.