जळगाव :- ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे २६ व २७ जून, २०२3 रोजी आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असून सर्वसाधारणपणे १० वी व १२ वी ग्रॅज्युएट / आय.टी.आय सर्व ट्रेड पात्रतेची एकूण १७१ रिक्तपदे भरण्याविषयी कळविलेले आहे.
हे पण वाचा..
राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव मध्ये भरती जाहीर ; ‘एवढा’ पगार मिळेल?
महाराष्ट्रात लिपिक पदांसाठी भरती मोठी, पदवी उत्तीर्णांना नोकरीचा चान्स ; आजच अर्ज करा
खुशखबर! महाराष्ट्र वन विभागात 2138 पदांवर भरती, 12वी उत्तीर्णां नोकरीची संधी
घाई करा! RBI मध्ये पदवीधरांसाठी विविध पदांवर बंपर भरती
या मेळाव्यात नमूद पात्रता धारण केलेल्या इच्छूक उमेदवारांनी सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना ॲप्लाय करण्यासाठी सेवायेजन नोंदणी असलेल्या उमेदवारांनी आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉग-ईन करुन ॲप्लाय करावा. तसेच ज्यांनी नोंदणी केलेली नाही. त्यांनी विभागाच्या नमूद संकेतस्थळावर जाऊन नांव नोंदणी करावी व तद्नंतर आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉगीन करुन ॲप्लाय करावा.
काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सकाळी ९.४५ ते स॔ध्या ६.१५) या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०२५७-२९५९७९० वर संपर्क साधावा. असे आवाहन सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता वि. जा. मुकणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.