मुंबई । आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या नव्या निर्णयानुसार मागील वर्षी पावसाळ्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता सुधारित दरानं मदत मिळणार आहे. मागील पावसाळ्यात नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांचे प्रस्ताव प्रलंबित होते, या शेतकऱ्यांसाठी आता नवीन सुधारित दराने मदत मिळणार आहे, त्यासाठी पंधराशे कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.
हे पण वाचा..
राज्यात मेंढी-शेळी पालनाकरिता अर्थसहाय्य योजना लवकरच सुरु होणार ; कोणाला मिळेल लाभ?
रावेर लोकसभेच्या उमेदवारीबाबत गिरीश महाजनांचे मोठं वक्तव्य ; काय म्हणाले वाचा..
मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मागील पावसाळ्यात नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांचे प्रस्ताव प्रलंबित होते, या शेतकऱ्यांसाठी आता नवीन सुधारित दराने मदत मिळणार आहे. नवीन सुधारित दराप्रमाणे जिरायत जमिनीसाठी 8 हजार पाचशे तर बागायत जमिनीसाठी 17 हजार रुपयांप्रमाणे मदत मिळणार आहे. यासाठी दीड हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतुद करण्यात आली आहे.