पुणे : 8 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी पुण्याचे अपर विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांना सीबीआयने अटक केली. या कारवाईने राज्यभरातील महसूल अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. आता सीबीआय तपासात धक्कादायक माहिती उघड होत आहे.
अपर विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड याचे लाच घेण्याचे एक सूत्र ठरले होते. भूसंपादनाचा वाढीव मोबदला देण्यासाठी १० टक्के लाच त्याच्याकडून घेतली जात होती. म्हणजेच भूसंपादनाचे मूल्य १ कोटी वाढवले तर १० लाख रुपये मला द्यावे लागतील, असे त्याच्याकडून सांगितले जात होते. सीबीआयने केलेल्या रेकॉर्डिंगमध्ये ही बाब स्पष्ट झाली आहे.
दरम्यान, डॉ. अनिल रामोड याला शनिवारी न्यायालयात हजर केले असून त्याला विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी १३ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली. सीबीआयाने पाच दिवासांची कोठडी मागितली होती. दरम्यान सीबीआयला अनिल रामोड याच्याकडे जी सहा कोटींची रक्कम मिळाली आहे त्यात दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा आहेत.