मुंबई । पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना बोगस बियाणे देऊन त्यांची फसवणूक करण्यात येत असल्याच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहे. मात्र आता शेतकऱ्यांना बोगस बियाणे विकणाऱ्यांची खैर नाही. बोगस बियाणे विकणाऱ्यांबाबत शिंदे-फडणवीस सरकराने मोठा निर्णय घेतला आहे.
यापुढे बोगस बियाणे विकणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा होणार असून, यासाठी येत्या अधिवेशनात कायदा आणला जाणार असल्याची घोषणा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे.
ज्यांच्याकडे बोगस बियाणे अथवा बोगस औषधे असतील, किंवा खते असतील त्यांनी तत्काळ नष्ट करावे. अन्यथा राज्यपाल यांच्याकडे मी पूर्ण रिपोर्ट देणार असून, त्यांच्यावर अंतिम निर्णय झाल्यावर त्या बोगस माल विकणाऱ्यांवर किमान 10 वर्षांची शिक्षा झाली पाहिजे असा कायदा येत्या अधिवेशनात आणला जाणार असल्याचे सत्तार म्हणाले आहेत.
हे पण वाचा..
गुलाबराव पाटलांसह पाच मंत्र्यांना मंत्रीपदावरून हटविण्याचे भाजप हायकमांडचे आदेश
राष्ट्रवादीत मोठा बदल! शरद पवारांनी कार्यकारी अध्यक्षपदी यांची केली निवड
नाशिकहून परताना अमळनेरातील कुटुंबावर काळाचा घाला ; कार अपघातात तिघांचा मृत्यू, चार जखमी
अकोल्यातील दैनिक लोकमतच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त होत असलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी बोलतांना कृषीमंत्री सत्तार यांनी ही घोषणा केली आहे.