राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी पाळधी व जळगाव येथे विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करून वाढदिवस साजरा करण्यात आला.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळीच दूरध्वनी वरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राज्यातील मान्यवर नेत्यांपासून ते सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत हजारो लोकांनी सकाळपासूनच शुभेच्छा दिल्या.
सालाबादप्रमाणे पाळधीत जाहीर सभेला मोठी उपस्थिती
वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी पाळधीत जाहीर सभा होतं असते यावर्षी ही भव्य जाहीर सभा पार पडली यावेळी बोलतांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्यसभेचे खासदार संजय राऊत हे आमच्या मतांवर निवडून आले आहेत. त्यांनी राजीनामा देऊन जनतेतून निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान दिले.ते म्हणाले की, आम्ही चाळीस केला. लोकांनी मतदान केले नसते तर ते निवडून आले नसते.दरम्यान पाळधी गावासाठी २२ कोटी रुपयांची पाणीयोजना पूर्ण झाली असून धरणगावसाठीही पाणीपुरवठ्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तेथे मोर्चा काढणाऱ्यांनी आपल्या नगराध्यक्षपदाच्या काळात काय केले असा सवालही त्यांनी केला.आता शिवसेना -भाजपचा मतदानाचा टक्का वाढणार असल्याचा दावा त्यांनी केला. सभेस आमदार संजय रायमूलकर, आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, भाजपचे सुभाष पाटील, संजय महाजन आदींनी मार्गदर्शन केले.
यांनी दिल्या दूरध्वनीवरून शुभेच्छा…
सकाळीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीवरून अभिष्टचिंतन केले. यासोबत मंत्री दादा भुसे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री सचिन पायलट केंद्रीय मंत्री कृष्ण पाल गुजर, राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कृषी मंत्री अब्दुल सत्तार खासदार श्रीकांत शिंदे, खासदार प्रतापराव जाधव, खासदार रक्षा खडसे, खासदार सी. आर. पाटील, खासदार उन्मेश पाटील, मंत्री उदय सामंत, मंत्री गिरीश महाजन, भरत गोगावले, शहाजी बापू, विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार एकनाथराव खडसे, अरुणभाई गुजराथी यांनी शुभेच्छा दिल्या.
पाळधी खुर्द आणि बुद्रुक या दोन्ही गावांसाठी तब्बल २२ कोटी रूपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली असून ही सौर उर्जेवर चालणारी राज्यातील पहिली पाणी पुरवठा योजना आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते या योजनेचे उदघाटन करण्यात आले होते. यानंतर ही योजना पूर्णत्वाकडेआली असून यातील जलवाहिन्यांमध्ये पाणी सोडून पाण्याची चाचणी शुभारंभ सोमवारी गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांना मंजुर करण्यात आलेल्या कृषी अवजारांची प्रातिनिधिक स्वरूपात कृषी खात्यातर्फे लहान व मोठे ट्रॅक्टर, कृषी अवजारे, बियाणे आदींचे तालुक्यातील अहिरे येथील शेतकरी लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.
पाळधी येथील श्रीराम मंदिरात बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. दिवसभरात ५८ बाटल्यांचे रक्त संकलन करण्यात आले. जी.एम. फाऊंडेशन आयोजीत नशिराबाद शिवसेनेतर्फे बांधकाम मजुरांना मोफत सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले.