जळगांव,(प्रतिनिधी)- सद्गुरू शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ अनिता वानखेडे यांच्या हस्ते महाविद्यालयात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचे व वृक्षारोपणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये व समाजात वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व रुजले पाहिजे म्हणून महाविद्यालय मार्फत रॅली काढण्यात आली. सदर रॅली ही सद्गुरू एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय ते श्रीकृष्ण कॉलनी अशी काढण्यात आली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षण संदर्भात जनजागृती करण्यात आली.
बी. एड प्रथम व द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला होता.
सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्या डॉ अनिता वानखेडे, प्रा. डॉ. प्रतिभा पाटील, प्रा. डॉ. राजेश गायकवाड, प्रा. संदिप तायडे, श्री. अरविंद पवार, श्री. पंकज वाघ, श्री. चंद्रकांत सपकाळे, बी. एड प्रथम व द्वितीय वर्षाचे विदयार्थी व विद्यार्थिनी आदी प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.