जळगाव | हवामान खात्याने उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना महत्वाचा इशारा दिला आहे. धुळे नंदूरबार, नाशिक, जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तविला आहे. आज दुपारी जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अचानकपणे आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली.
हवामान खात्याच्या माहितीनुसार नंदुरबार जिल्ह्यांतील काही ठिकाणी तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ आणि ताशी 30-40 किमी प्रतितास वेगाने वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. नाशिक आणि जळगाव पुढील ३-४ तासांत निर्जन ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असून घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केली आहे.
४ ९ जून, १२.१५ दुपार, राज्यात उत्तर मध्य महाराष्ट्र, धुळे नंदूरबार, नाशिक, जळगाव, ढगाळ आकाश …
गडगडाटासह पावसाची शक्यता पुढच्या 2,3 तासात. pic.twitter.com/p0bGc2hVRd— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 4, 2023
दरम्यान, जळगावात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झालेले होते. आज अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे परिसरात गारवा निर्माण झाल्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.